घरताज्या घडामोडीहोय ! मुख्यमंत्र्यांनी माझ्या कामाची प्रशंसा केली : नवाब मलिक

होय ! मुख्यमंत्र्यांनी माझ्या कामाची प्रशंसा केली : नवाब मलिक

Subscribe

मी तुम्हाला आरसा दाखवणारच...

राज्यात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच मलिकांनी आज(गुरूवार) पत्रकार परिषद घेत समीर खान यांच्यावरील गंभीर आरोप आणि ड्रग्ज कनेक्शनबाबत मोठा बॉम्बस्फोट केला आहे. दरम्यान, माझ्या पाठिशी जसे मंत्रीमंडळ आहे. तसे आदरणीय पवारसाहेब व पक्ष पाठिशी असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी माझ्या कामाची प्रशंसा केली आणि संपूर्ण मंत्रीमंडळ माझ्या पाठीशी असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना दिली. माझ्या पाठिशी जसे मंत्रीमंडळ आहे. तसे आदरणीय पवारसाहेब व पक्ष पाठिशी असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. दरम्यान माझी लढाई ही अन्यायाविरोधात आहे. सध्या ही लढाई लढण्यासाठी मी एकटा पुरेसा असून ही लढाई पूर्णत्वास नेल्याशिवाय थांबणार नाही. असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : गुजरातच्या ड्रग्ज कनेक्शनबाबत नवाब मलिकांचा मोठा बॉम्ब


मी तुम्हाला आरसा दाखवणारच…

माझे कितीही पुतळे जाळा मी तुम्हाला आरसा दाखवणारच…आरसा दाखवल्यावर इतके का घाबरताय असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल ट्वीटरवर मला एका जनावराची उपमा देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचे नेते नेहमीच प्राण्यांची नावे देत असतात. त्यातून त्यांची काय संस्कृती आहे हे दिसून येते असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला. भाजपचे नेते माणसाला माणूस समजत नाहीत. माणसाला जनावराची उपमा देणे ही यांची संस्कृती आहे. या उपाधीमुळे आमची इज्जत जात नाही उलट भाजपची काय मानसिकता आहे हे स्पष्ट होते असेही नवाब मलिक म्हणाले.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -