घरताज्या घडामोडीकोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, सर्वोतोपरी मदत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, सर्वोतोपरी मदत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Subscribe

प्रत्येक जिल्ह्यात एनडीआरएफ सारखी टीम तयार करण्याचा निर्णय घेणार आहे.

राज्यात हवामान बदलाचा प्रचंड मोठा फटका बसला आहे. आतापर्यंत आपण हवामान बदलाबाबत ऐकत होतो आता त्याचे फटके आपण अनुभवत आहोत. सर्वांनीच वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे. दरडी कोसळत आहेत वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या वसलेल्या गावांवर आता दरडी कोसळत आहेत. क्षणार्धात आपले माता बांधव नागरिक दबून जात आहेत. राज्यात जे काही नुकसान झाले आहेत त्याची नुकसान भरपाई राज्य सरकार करेल. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. आवश्यक ती सर्वोतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त नागरिकांना दिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूणमधील पूरग्रस्त दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करुन माध्यमांशी संवाद साधला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटल आहे. आहे. राज्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कुठे दरडी कोसळत आहेत तर सांगली कोल्हापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. कृष्णेचे पाणी धोक्याच्या पातळीवर आले आहे. पावसाची सुरुवात गेले काही वर्ष चक्रीवादळाने होते आहे तर नंतर अचानक ढगफुटी पूर येतो आहे. पीकांचे आणि मालमत्तेचे मोठं नुकसान होतं आहे. विध्वंस झाला आहे.

- Advertisement -

कोकणात मागे तौत्के चक्रीवादळ स्पर्श करुन गेलं तर निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. मात्र आता जे काही नुकसान झालंय त्याचं नुकसान भरपाई करण्यात येईल. आयुष्यच उध्वस्त झालं आहे. नांगरिकांना मदत किंवा पुन्हा त्यांच्या पायावर उभ करणं गरजेचे आहे. रायगड, सिंधुदूर्ग, सांगली कोल्हापूर, सातारा, सांगली मधील आढाव घेतला जात आहे. तात्काळ मदत करण्यात येणार आहे. पूरग्रस्तांना धान्य देत असून वैद्यकीय मदत करण्यात येणार आहे. पूराचे पाणी ओसरल्यानंतर आजार उद्भवण्याची शक्यता आहे यामुळे डॉक्टरांच्या टीम आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांना सुद्धा पाठवण्यात येणार आहे.

पूराचे व्यवस्थापन करणार

राज्यात पूराचे व्यवस्थापन करण्यासाठी जी योजना करायची असेल ती करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. नुसती लोकांना बरं वाटावी अशी घोषणा करणार नाही तर सांगली, सातारा, सिंधुदूर्ग या भागातील आढाव घेतल्यानंतर योग्य ती घोषणा करण्यात येईल. नागरिकांना सर्व मदत केली जाईल. मदतीमध्ये तांत्रिक मुद्दे उपस्थित होणार नाहीत. ज्या नागरिकांनी विमा घेतलाय तसेच ज्यांनी विमा नाही काढला अशा नागरिकांची नोंदणी करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

- Advertisement -

प्रत्येक जिल्ह्यात एनडीआरएफ सारखे पथक

राज्यात वारंवार येणारी संकटाची मालिका पाहता प्रत्येक जिल्ह्यात एनडीआरएफ सारखी टीम तयार करण्याचा निर्णय घेणार आहे. काही भागात दरडी कोसळल्याच्या ठीकाणी माणसं जात होती परंतू यंत्रसामग्री जाऊ शकत नव्हती यामुळे पथकांना पोहोचायला उशीर लागला असाल्याचे कारणही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

केंद्र सरकारकडून सहकार्य

केंद्र सरकारकडून दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा फोन आला होता. एनडीआरएफ, आर्मी, नेव्ही एअरफोर्स देऊ असे सांगितले आहे. दुरगामी सेवांसाठी त्यांचे सहकार्य पाहिजे आहे. कोविड मुळे आर्थिक परिस्थिती मंदावली आहे. त्याच्यामुळे संकट येत असून त्यावरही सामना करत आहोत. त्वरित केंद्राकडे मागणी करणार नाही वस्तुस्थितीवर आधारित अशी मागणी करण्यात येणार आहे. सगळा आंदाज आल्यावर मागणी करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -