घरCORONA UPDATECorona Vaccination: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

Corona Vaccination: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

Subscribe

 

राज्यात सध्या कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना लसीचा पहिला डोस टोचून घेतला आहे. जे.जे. रुग्णालयात मुख्यमंत्र्यांना कोरोना लस घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पत्नी आणि सामना वृत्तपत्राच्या संपादक रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील होते. नेत्रचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची लस घेतली.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस घेतली आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन कोरोना लस घेणार असल्याची माहिती दिली होती. आज त्यांनी जे.जे.रुग्णालयात लस घेतली आहे. माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी देखील कोरोनाची घेतली आहे. तसेच रश्मी ठाकरेंच्या मातोश्री मीनाताई पाटणकरांचं लसीकरण झालं आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनीही कोरोना लस डोचून घेतली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी जे.जे. रुग्णालयात घेतली कोरोना लस | cm uddhav thackeray received covid 19 vaccine

राज्यात सध्या कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीचा पहिला डोस टोचून घेतला आहे. जे.जे. रुग्णालयात मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची लस घेतली असून यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नेत्रचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत त्यांनी लस घेतली.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Thursday, March 11, 2021

 

लस घेतल्यानंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

राज्यातील कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी कोरोना लस घेतली. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राष्ट्रवादीचे सर्वसर्वो शरद पवार यांच्यासह अनेत नेत्यांनी लस घेतली आहे. लस घेतल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘कोरोना लसीबाबत कोणतीही भीती आणि संभ्रम मनात ठेवण्याची गरज नाही. मी स्वतः कोरोना लस घेतली आहे. कोरोना लस घेताना अजिबात कळत सुद्धा नाही. एवढ्या छान पद्धतीने कोरोना लस दिली जाते. पण आता कोरोनाचा धोका वाढत आहे, त्यामुळे जे कोरोना लस घेण्यासाठी पात्र आहेत, त्या सर्वांनी मनात कोणतेही किंतु परंतु न आणता कोरोना लस घ्यावी, अशी विनंती.’


हेही वाचा – नागपूरात ७ दिवसांचा लॉकडाऊन; नियमावली जाहीर


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -