घरताज्या घडामोडीराज ठाकरे मास्क घालत नाहीत, मुख्यमंत्री म्हणाले...

राज ठाकरे मास्क घालत नाहीत, मुख्यमंत्री म्हणाले…

Subscribe

राज्यात कोरोनाचे संकट पाहता येत्या काही महिन्यांसाठी आपल्या चेहऱ्यावरचा मास्क कायमच ठेवावा लागणार आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट अजुनही संपलेले नाही. म्हणूनच यापुढच्या काळातही कोरोनापासून बचावाची त्रिसुत्री आपल्याला कायम ठेवावी लागणार आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यावेळी राज ठाकरे मास्क वापरत नाहीत अशी माहिती पत्रकारांकडून उद्धव ठाकरे यांना देण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अतिशय शांत आणि संयमी शैलीत राज ठाकरेंना उत्तर दिले आहे. मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनाही मास्क का वापरत नाही असा सवाल केला होता. त्यावर राज ठाकरे यांनी आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिले होते. (CM uddhav thackeray replied on raj thackeray not wearing mask quetion)

काय म्हणाले मुख्यमंत्री ?

राज आणि उद्धव ठाकरे हे काही दिवसांपूर्वीच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या दक्षिण मुंबईतील पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. त्यावेळीही मुख्यमंत्र्यांनी मास्क घातले होते, पण राज ठाकरे हे विना मास्क दिसले होते. मराठी भाषा दिनाच्या निमित्तानेही राज ठाकरे हे पुन्हा एकदा मास्क न घालताच कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांनी मास्क न वापरण्याचे कारण राज ठाकरे यांना विचारले होते. तर रविवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने झालेल्या पत्रकार परिषदेतही उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे मास्क वापरत नसल्याची माहिती देण्यात आली. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या मास्क न वापरण्याच्या गोष्टीला उत्तर दिले. उद्धव ठाकरे म्हणाले की, राज ठाकरे यांना माझा नमस्कार सांगा.

- Advertisement -

राज ठाकरे काय म्हणाले होते ?

मी मास्क घालत नाही, तुम्हालाही सांगतो. मनसेच्या मराठी भाषा दिनानिमित्तच्या स्वाक्षरी मोहीमेला पोलिसांनी परवानगी न दिल्याबाबत राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. मंत्र्यांनी धुडघुस घातलेला चालतो, पण शिवजयंती आणि मराठी भाषा दिनासाठी परवानगी नाकारली जाते. एवढीच काळजी वाटते तर सर्व निवडणुका एक वर्ष पुढे ढकला, काहीही बिघडत नाहीत असेही राज ठाकरेंने सुनावले होते.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -