घरताज्या घडामोडीमुंबईचा हेरिटेज वारसा जपणे आवश्यक - मुख्यमंत्री

मुंबईचा हेरिटेज वारसा जपणे आवश्यक – मुख्यमंत्री

Subscribe

मुंबई महापालिकेची १२५ वर्षे पुरातन, मजबूत इमारत, मुंबईतील किल्ले, पुरातन वास्तू यांचा वारसा जपण्याची आणि तो वारसा पुढे नेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

मुंबई महापालिकेची १२५ वर्षे पुरातन, मजबूत इमारत, मुंबईतील किल्ले, पुरातन वास्तू यांचा वारसा जपण्याची आणि तो वारसा पुढे नेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबई महापालिका मुख्यालयाच्या १२५ वर्षे जुन्या हेरिटेज इमारतीचे दरवाजे आता देशी, विदेशी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी पालिका मुख्यालयात ‘हेरीटेज वॉक’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आले. याप्रसंगी, उप मुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, उप महापौर ऍड. सुहास वाडकर, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, आमदार रईस शेख, पालिका आयुक्त इकबाल चहल, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

मी १३-१४ वर्षांचा असल्यापासून पालिका सभागृहात महापौर निवडणुकीप्रसंगी येत आहे. मात्र, एक दिवस राज्याचा मुख्यमंत्री म्हणून या सभागृहात येऊन महापौरांच्या जागेवर बसेन असा विचार मनात कधी आला नव्हता. मुख्यमंत्री म्हणून मी योगायोगानेच झालो आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच, मुंबई महापालिकेत गोंधळ, आरडाओरडा आपण ऐकतो, बघतो पण आजपासून पालिकेच्या भिंती, दालन बोलू लागतील आणि आठवणी सांगू लागतील. मुंबईत शिवडी, वांद्रे, वरळी, वर्सोवा, माहीम येथील किल्ले हा आपला इतिहास आहे. हा इतिहास व येथील पुरातन वारसा जपण्याची व त्याला पुढे नेण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे मुंबईत इंग्रजांनी निर्माण केलेल्या वास्तू आहेत,मात्र आपणही काहीतरी चांगल्या वास्तू निर्माण करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

मुंबईचा बकालपणा दूर करणे आवश्यक – उप मुख्यमंत्री

मी १९८५ पासून मुंबईतील विधिमंडळात येत असून कधी मुंबई महापालिका आतमधून पहिली नव्हती. मुंबई महापालिका व पर्यटन विकास महामंडळ यांच्या पुढाकाराने आज मुंबई महापालिकेच्या पुरातन वास्तू प्रथमच बघण्याची संधी आमच्या ‘लेकामुळे’ पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यामुळे बघण्याची संधी लाभली. मात्र देशाची आर्थिक राजधानी असलेल्या आणि मोठे बजेट असलेल्या मुंबईला बकालपणा आणणारी अनधिकृत बांधकामे, टपऱ्या यांची पर्यायी व्यवस्था करून ते हटवायला पाहिजेत, अशी आदेशवजा सूचना उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व सत्ताधारी शिवसेनेला दिली.

मुंबईत संयुक्त महाराष्ट्र चळवळ राबवली गेली. इंग्रजांची हकालपट्टी याच मुंबईतून सुरू झाली. मोठमोठे राजकीय नेते,खेळाडू, अभियंते घडले. २६/११चा हल्ला, महापूर यांसारखी संकटे परतवून लावण्याची ताकद मुंबईकरांमध्ये आहे, या शब्दात त्यांनी मुंबईकरांचे कौतुक केले. तसेच, मुंबईत ‘नाइट लाइफ’ ही संकल्पना राबविणे आजच्या तरुणांची गरज आहे. मात्र, त्याचवेळी कायदा व सुव्यवस्था पाहणे आणि आपण मराठीचे पुरस्कर्ते असल्याने ‘हेरिटेज वॉक’ ला मराठी शब्द देणे महत्वाचे असल्याचे सांगत अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांना हळुवार चिमटा काढला.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या वास्तूला मराठी माणसाचे हात 

मुंबई महापालिकेची पुरातन वास्तू उभारण्यात केवळ इंग्रजांचा नव्हे तर मराठी माणसाचा हातभार लागला आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले.तसेच, अंदाजित खर्चापेक्षाही कमी खर्चात चांगली मजबूत वास्तू उभारण्यात आली आहे. मात्र आता २५ कोटींची कामे ५०० कोटींवर नेऊ नये. मुंबईत अठरापगड जातीधर्माचे लोक राहतात. ज्यांनी मुंबई उभारण्यात हातभार लावला. मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा देणारेही इथे सुखनैव राहतात, असे सांगत त्यांनी अभिनेत्री कंगना रानौत हीचा नामोल्लेख टाळत तिला टोला लगावला. तसेच, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी दिल्ली मेट्रोतून प्रवासावेळी केलेल्या उल्लेखाचा समाचार घेत ती मेट्रो काँग्रेसने बांधल्याचे सांगत फडणवीस यांनाही टोला लगावला.

‘हेरिटेज वॉक’स्वप्नपूर्ती – आदित्य ठाकरे

मुंबई महापालिका मुख्यालयाच्या इमारतीत ‘हेरिटेज वॉक’ ही संकल्पना राबवल्याने आपली स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद पर्यटन व पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिकेत अनेकदा आल्यानंतर एक दिवस ‘ हेरिटेज वॉक’ संकल्पना मनात आली, असे त्यांनी सांगितले. यापुढील काळात मुंबईतील वानखेडे स्टेडियम, मुंबई उच्च न्यायालय यक ठिकाणीही पर्यटन सफर घडविण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी, महापौर किशोरी पेडणेकर आणि आयुक्त इकबाल चहल यांनीही मार्गदर्शन केले.


हेही वाचा – सुशीलकुमार शिंदेंनी चुकून फोडलं काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचं नाव


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -