घरताज्या घडामोडीED,CBI लोकशाहीला पांढरा रंग मारण्याचं काम करतंय का?, मुख्यमंत्र्यांचा भाजपवर निशाणा

ED,CBI लोकशाहीला पांढरा रंग मारण्याचं काम करतंय का?, मुख्यमंत्र्यांचा भाजपवर निशाणा

Subscribe

अध्यक्षपदाच्या निवडणुकासाठी ५ ते ६ दिवसांचा कालावधी लागतो यामुळे एक दिवसात हि निवडणूक घेणं शक्य नाही.

विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवासाच्या कामाकाजादरम्यान भाजप नेत्यांनी गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्यामुळे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केलं आहे. यावरुन भाजपकडून लोकशाहीचा गळा दाबला असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांवर केला आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. जर आमच्यावर आरोप झाले की लोकशाहीचा गळा दाबला आणि लोकशाहीला काळीमा लावला त्यांच्याकडून जे काही दबावाचे तंत्र येत आहेत. ईडी, सीबीआय वगैरे हे काही लोकशाहीला पांढरा रंग मारण्याचे काम सुरु आहे का? जे काम तुम्हाला सभागृहात जमत नसेल तर तुम्ही सांगा की या सरकारला तोंड देणं कठीण होत आहे. म्हणून आम्ही आमच्या अधिकारांचा गैरवापर करुन या सरकारला दबावाखाली आणतो आहे असं जाहीर करा आणि त्याला लोकशाही मानायचे असेल तर ती लोकशाही ते माणतील देशातील जनता नाही माननार अशी खोचक प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

नीच वागणार नाही

लसीकरणाच्या बाबतीतही आम्ही राजकारण आणू शकतो. विरोधी पक्षनेत्यांनी कितीही राजकारण केलं तरी आम्ही सरकार म्हणून जनतेच्या जिवाशी खेळ होईल असे राजकारण करणार नाही. एवढा नीचपणा आमच्यामध्ये नाही. आमची मागणीपेक्षा क्षमता आणि त्याच्या बरोबरीने आवश्यकता ही १२ कोटीची आहे. ज्यावेळेला १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची लसीकरणाची जबाबदारी केंद्रानं राज्य सरकारव दिली ती जबाबदारी त्या वयोगटातील साधारण ६ कोटी जनता राज्यात आहे. या ६ कोटी जनतेला दोन डोस म्हणजे १२ कोटी लसीचे डोस एका चेकने घेण्याची तयारी दाखवली होती. परंतु कोरोना लसीचा पुरवठा होत नव्हता यामुळे ती थांबवली होती. परंतु आता आपण क्षमता दाखवली आहे. सध्या १५ लाखाची क्षमता आहे आवश्यकता असेल तर ती वाढवू परंतु सद्या कोरोना लसींचे डोस अपुरे आहेत. लसीकरणाच्या बाबतीत आम्ही राजकारण करणार नाही तसेच एवढे नीचही वागणार नाही.

- Advertisement -

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेऊ

राज्यातील कोरोना परिस्थिती पुर्ववत झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक घेण्यासाठी विनंती केली होती. परंतु आमदारांची आरटीपीआर चाचणी फक्त ७२ तासांसाठी ग्राह्य धरली जाते. अध्यक्षपदाच्या निवडणुकासाठी ५ ते ६ दिवसांचा कालावधी लागतो यामुळे एक दिवसात हि निवडणूक घेणं शक्य नाही. कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेऊ असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -