घरताज्या घडामोडीबाळासाहेब भोळे होते पण मी 'धूर्त' फसणार नाही, मुख्यमंत्री ठाकरेंचा भाजपवर निशाणा

बाळासाहेब भोळे होते पण मी ‘धूर्त’ फसणार नाही, मुख्यमंत्री ठाकरेंचा भाजपवर निशाणा

Subscribe

शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिली नाही अशी टीका विरोधक नेहमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर करतात. या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे भोळे होते परंतु मी भोळा नाही तर धूर्त आहे. बाळासाहेबांना भाजपने वेळोवेळी कसं फसवलं आहे ते मी पाहिले आहे. असा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी सध्याची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची राहिली नाही अशी टीका करण्यात येते असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, माझ्यावर आरोप करत आहेत. मी म्हणालो बरोबर आहे. बाळासाहेब ठाकरे भोळे होते. त्यावेळी भाजपने बाळासाहेब ठाकरे यांनी कसं फसवलं हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे भाजपसोबत धूर्तपणे वागतो आहे.

- Advertisement -

माझ्या वडिलांनी माझ्या रक्तामध्ये हिंदुत्व भिनवलं आहे. हिंदुत्वाच्या आडून भाजपा त्यांचे जे डाव साधत होता त्याकडे बाळासाहेब ठाकरेंनी त्याच्याकडे कानाडोळ करत होते. मी तसं काही करणार नाही. जर आम्ही वाईट कारभार करत असू तर आम्हाला जनतेसमोर उघडं पाडा असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

…हा विकृतपणा तुमच्याकडे कसा आला?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. कुठे नेहऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा प्रश्न भाजपकडून करण्यात येत असतो. परंतु मुख्य़मंत्री म्हणाले भाजपला विचारण्याची गरज आहे की, राज्याची संस्कृती पाहता कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? तुमच्यात एवढी सुडबुद्धी कुठुन आली. कोणती संस्कृती आहे? तुमच्या रक्तामध्ये सुडबुद्धी कशी आली. विकृतपणा कसा आला? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : भाजप-राष्ट्रवादीच्या २०१७ मधील छुप्या युतीची माहिती नव्हती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -