घरताज्या घडामोडी...तेव्हा आम्ही राजभवनात कधीतरी शिष्टमंडळ घेऊन यायचो, पण रोज नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना...

…तेव्हा आम्ही राजभवनात कधीतरी शिष्टमंडळ घेऊन यायचो, पण रोज नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

Subscribe

आपलं राजभवन देशातील सर्वोत्तम असेल कारण या वास्तूला ५० एकरची विस्तृत जागा लाभली आहे. त्यानंतर अथांग समुद्र एका बाजुला आहे. दुसऱ्या बाजूला शहरातील जंगल म्हणावे अशी झाडी आहे. त्याच प्रमाणे हवासुद्धा थंड असते. राजकीय हवा कशीही असू द्या परंतु मलबार हिलमध्ये असल्यामुळे हवा चांगली असते.

आम्ही विरोधी पक्षात होतो तेव्हा राज्यपालांची भेट घेण्यासाठी आणि आमची गाऱ्हाणी त्यांच्या कानावर घालण्यासाठी वर्षातून एक किंवा दोन वेळी राजभवनावर यायचो पण रोज नाही. असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची सारखी सारखी भेट घेणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधला आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नवीन दरबार हाॅलचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारसुद्धा उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी संवाद साधताना विरोधकांवर निशाणा साधला असून दरबार हॉलचे नुतनीकरण करणाऱ्यांचे अभिनंदन केलं आहे.

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजभवनातील नवीन दरबार हॉलचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधताना विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला असून टोलवा-टोलवी केली आहे. राजकीय हवा कशीही असू द्या परंतु मलबार हिलमधली हवा थंड असते असा टोला मुख्यंत्र्यांनी लगावला आहे.

- Advertisement -

राज्यपालांच्या भेटीला रोज येत नव्हतो

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधताना म्हटलं आहे की, राजभवनातील दरबार हॉलचे उद्घाटन करण्यासाठी उपस्थिती लावली आहे. मुख्यमंत्री म्हणून मला स्वतःला वैयक्तिक आनंद होत आहे. याचे कारण असे की दरबार हॉल राजभवन आम्हाला नवीन नाही आहे. आम्ही विरोधी पक्षात होतो तेव्हा वर्षातून एकदा किंवा दोनवेळा शिष्टमंडळ घेऊन येत होतो. अगदी रोज काही येत नव्हतो परंतु एखाद दुसऱ्या वेळी येत होतो. राज्यपालांना भेटायचो त्यांच्या कानी आमच्या काही व्यथा आणि मागण्या घालत होतो. आजसुद्धा आवश्यकता असेल तर आमचा संवाद सुरुच असतो. पण विशेष म्हणजे या वास्तुमध्ये ज्या अनेक घटका पाहिल्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

याच वास्तूमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या नकाशाचे अनावरण

१०० वर्ष गेली पण या १०० वर्षाच्या काळात जसं पारतंत्र्य पाहिले स्वातंत्र्याच्या काही घडामोडी गेल्या आहेत. परंतु एका गोष्टीचे विशेष अभिमान वाटतो तो म्हणजे याच वास्तूमधून ३० एप्रिल १९६० रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी त्या काळी संयुक्त महाराष्ट्राच्या नकाशाचे जे औपचारिक अनावर केलं त्याबद्दल विशेष अभिमान आणि आनंद वाटतो अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली.

- Advertisement -

राजकीय हवा थंड असते परंतु मलबारमध्ये चांगली हवा

या वास्तूबाबत काय सांगायचे हे नवीन रुप धारण केलेल बांधकाम आहे. ज्यांचे ज्यांचे ही वास्तू करण्यासाठी हातभार लागले आहेत त्यांचे विशेष अभिनंदन करतो. अप्रतिम सौंदर्य तुम्ही पुन्हा एकदा नव्या दमाने सर्वांसमोर ठेवलं आहे. कदाचित आपलं राजभवन देशातील सर्वोत्तम असेल कारण या वास्तूला ५० एकरची विस्तृत जागा लाभली आहे. त्यानंतर अथांग समुद्र एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला शहरातील जंगल म्हणावे अशी झाडी आहे. त्याच प्रमाणे हवासुद्धा थंड असते. राजकीय हवा कशीही असू द्या परंतु मलबार हिलमध्ये असल्यामुळे हवा चांगली असते. शहरात असूनदेखील इथे काहीवेळा पावसाच्या सुरुवातीला थुई थुई नाचणाऱ्या मोराचेसुद्धा फोटो आणि सर्पमित्रांनी पकडलेल्या विषारी नागाचेही फोटो येत असतात. थोडक्यात अशी वास्तु शोधूनही सापडणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.

शिवसेना प्रमुखांसोबत राजभवनात यायचो

माझ्या माहितीनुसार ही ब्रिटीश गव्हर्नरनंतर हे चौथे निवासस्थान आहे. मला जुन्या काही गोष्टी आठवतात शिवसेना प्रमुखांसोबत येत होतो. राज्यपालांना भेटलाय त्यातील एक भेट तत्कालीन राष्ट्रपती ज्ञानी जैल सिंह यांनी बाळासाहेबांना बोलवले होते. तो किस्सा बाळासाहेबांनी अनेकदा सांगितला आहे. यानंतर राष्ट्रपती प्रणवदा यांनी भेटायला बोलवले होते. अशा अनेक आठवणी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या आहेत.

पुढच्या घडामोडी पाहण्यासाठी नव्या दमाने सज्ज

या संपूर्ण वास्तूचे एक विशेष वर्णन करायचे झाले तर जुना वारसा जपून आपण आधुनिकतेकडे चाललो आहे. जुन्या वास्तू आणि जुन्या इमारती, जवळपास १०० वर्षे पहिल्या वास्तूने ऊन, वारा, समुद्राच्या लाटा तडाखे हे सोसले भोवले सहाजिकच आहे. वास्तू कमकुवत होते पंरतु तिचे वैशिष्ट्ये कायम ठेवून नुतनीकरण करण हे फार आव्हानात्मक असते. ते आव्हान आपण पेलल आहे. त्यामुळे सगळ्यांचे अभिनंदन करतो. आधुनिकता अंगी बाळगावी लागते पंरतु त्याच वेळी संस्कृती जपणं फार महत्त्वाचे आहे. त्या काळातील पारतंत्र्याची सगळ्या घडामोडी बोलणारी वास्तू आता आपल्या सशक्त लोकशाहीचा जो उल्लेख झाला त्याच्या पुढच्या घडामोडी पाहण्यासाठी नव्या दमाने सज्ज झाली आहे. मी परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि नव्या वास्तूमध्ये आनंददायी घटना घडतील अशी आपेक्षा असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.


हेही वाचा : …अन् आदित्य ठाकरेंकडून अजितदादांसाठी स्टेअरिंग हातात घेत गाडीचं सारथ्य

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -