घरताज्या घडामोडीमराठीनंतर हिंदुत्वाचा खेळ सुरु करुन अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं राज...

मराठीनंतर हिंदुत्वाचा खेळ सुरु करुन अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंवर टीकास्त्र

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आता हिंदुत्वाचा मुद्दा अधिक आक्रमकपणे धरला आहे. यावरुन यापूर्वी त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली होती. यावरुन राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र डागलं आहे. काही खेळाडू कधी मराठीचा खेळ तर कधी हिंदुत्वाचा खेळ खेळत आहेत. तसेच भोंग्यांवरुनही राज ठाकरेंवर टीकास्त्र डागताना मुख्यमंत्री म्हणाले की, गाजराची पुंगी वाजली तर वाजली असे भोंगेदारी पुंगीदारी खुप बघितले आहेत. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि तो आहेच अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर प्रहार केला आहे.

मुख्यमंत्री आणि शिवसेना पश्रप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांना हिंदुत्व आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, मी अशा खेळाडूंकडे लक्ष देत नाही. हे खेळाडू कधी कोणत्या मैदानात खेळत कोणते खेळ करतात हे आतापर्यंत लोकांनी अनुभवलं आहे. कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ कधी याचा खेळ असे खेळाडू असतात त्यांचा मी अपमान करु इच्छित नाही. इतर जे काही खेळ करतात डोंबारी वगैरे त्यांचा अपमान करु इच्छित नाही असे खेळ महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

- Advertisement -

फुकटात मनोरंजन मिळत असेल तर का सोडायचं

ते काय झालं आहे. दोन वर्षाच्या कालखंडात सगळं बंद होते परंतु करमणूक फुकटात मिळत असेल तर का नाही पाहायची? आणि म्हणून मी जी शिवसेनेची ओळख करुन देण्याची गरज नाही. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि तो आहेच. हे मी विधानसभेत सुद्धा बोललो ते मला लपवण्याची गरज नाही. आणि मी ते लपवणार नाही, असे ठामपणे उद्धव ठाकरे म्हणाले.

भूमिका बदल्याच्या चाळ्यांना माकडचाळे म्हणतात

तुम्ही हिंदूंना आणि हिंदू जनतेला नासमज समजू नका, त्यांना बरोबर कळतं, शेवटी हिंदू म्हणजे कोण आहेत. ते परके नाही आहेत. काही मराठी, हिंदी, बंगाली बोलतात आपल्या देशात अनेक भाषा बोलतात. आम्ही मराठी बाकीच्यांना हाकलून द्याचे ते फसले की, आम्ही हिंदू बाकिच्यांना घरात बोलवायचे, हे जे चाळे चालतात ना त्यांना माकडचाळे म्हणतात. त्यामुळे हिंदुत्वाचे दावेदार शब्द सोडा पण आपले हिंदू आणि आपल्या देशातील जनता नासमज नाही.

- Advertisement -

राज ठाकरेंचा अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न

आपली स्वतःची हिंदुत्वाची ओळख टिकवण्यासाठी शिवसेनेला काही वेगळं करावे लागले का? हिंदुत्वादी सगळेच बोलत आहेत त्यामुळे शिवसेनेला कसं ओळखायचे असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनवा करण्यात आला होता. यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ओळखण्याची गरज नाही. शिवसेना आणि शिवसेना प्रमुखांनी सांगितले होते की हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. त्यामुळे आम्ही हिंदुत्वाचा डंका वाजवून सांगत नाही बसत आम्ही हिंदू आहोत. का असं तुम्हाला सांगावे लागतात, का तुमच्या झेंड्यांचे रंग बदलत आहेत. कधी या रंगाचा कधी त्या रंगाचा, असे का करावे लागत आहे. आम्ही कधीच झेंडा बदलत नाही आहे. दरवेळेला जन्मापासून नवीन झेंडेधारी आहेत त्यांना ओळख आणि अस्तित्व दाखवण्याची लढाई, अस्तित्व टिकवण्याची वेगळीच परंतु आमचे अस्तिव्त आहे. असे ज्यांना करावे लागत आहे. त्यांचे ठिक आहे. त्यांचा हक्का आहे. आपल्या देशात लोकशाही आहे. पहिल्यापासून काही लोकांचा प्रवास पाहिला तर मशिदीमधून बाहेर पडताना त्यांचे फोटो आहे. कधी हिंदुंसोबत आहेत. मी कशाला लक्ष देऊ असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.


हेही वाचा : हुतात्मा स्मारक हे राजकीय वक्तव्य करण्याकरीता नाही, फडणवीसांची अरविंद सावंतांवर टीका

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -