घरताज्या घडामोडी'शिव संपर्क अभियान' 22 मार्च होणार सुरू; आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व...

‘शिव संपर्क अभियान’ 22 मार्च होणार सुरू; आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित करणार

Subscribe

पहिल्या टप्यातील १९ जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेचा एक खासदार आणि त्यांच्यासोबत शिवसेना पदाधिकाऱ्यांची १२ जणांची टीम कार्यरत असणार आहेत.

शिवसेनेच्या ‘शिव संपर्क अभियाना’ला मंगळवारी २२ मार्च सुरुवात होणार आहे. शिवसेनेचे हे अभियान २५ मार्चपर्यंत असणार आहे. याच अनुषंगाने आज शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री शिवसेनेच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना रविवारी दुपारी १२ वाजता संबोधित करणार आहेत. पहिल्या टप्यात पर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ जिल्ह्यात शिवसेनेचे ‘शिव संपर्क अभियान’ असणार आहे.

राज्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसेच राज्यात गेल्या अडीच वर्षात शिवसेनेने केलेल्या आणि करत असलेल्या विकासात्मक कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी, शिवसेनेने ‘शिव संपर्क अभियान’ सुरू केले आहे. या अभियानाचा पहिला टप्पा २२ ते २५ मार्च दरम्यान पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील एकूण १९ जिल्ह्यात सुरू होणार आहे. या १९ जिल्ह्यात शिवसेनेचे १९ खासदार ‘शिव संपर्क अभियान’ सुरू करणार आहेत.

- Advertisement -

पहिल्या टप्यातील १९ जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेचा एक खासदार आणि त्यांच्यासोबत शिवसेना पदाधिकाऱ्यांची १२ जणांची टीम कार्यरत असणार आहे. ‘शिव संपर्क अभियाना’च्या मार्फत शिवसेना सर्व सामान्य नागरिकांपर्यंत राज्यात शिवसेना करत असलेल्या विकास कामांची माहिती पोहोचवणार आहे. शिवसेनेच्या या ‘शिव संपर्क अभियाना’त सहभागी असणाऱ्या खासदारांना आणि पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी १२ वाजता व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संबोधित करणार आहेत. यावेळी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, विनायक राऊत तसेच मुंबईतील इतर खासदार शिवसेना भवनात उपस्थित राहणार आहेत.


हेही वाचा – पवारांची क्रिकेटवरील पकड सैलावली, इच्छेविरुद्ध एमसीएची सर्वसाधारण सभा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -