घरताज्या घडामोडीOmicron variant : राज्यात पुन्हा कोरोना निर्बंध? मुख्यमंत्री घेणार व्हिडिओ कॉन्फरन्स, अजितदादांची...

Omicron variant : राज्यात पुन्हा कोरोना निर्बंध? मुख्यमंत्री घेणार व्हिडिओ कॉन्फरन्स, अजितदादांची माहिती

Subscribe

महाराष्ट्रात कोरोनाचाचे निर्बंध शिथिल होत असतानाच दुसरीकडे जगभरात ओमिक्रॉनच्या दहशतीने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ओमिक्रॉन या नव्या व्हेरीयंटमुळे युरोपियन देशांमध्ये पुन्हा निर्बंध घालण्यात येत आहेत. अशातच महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध घालण्यात येणार का ? असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करण्यात आला. पुण्यातील आढावा बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना अनेक प्रश्नांवर उत्तरे दिली. राज्यात निर्बंधाबाबत विचारण्यात आल्यावर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स घेणार असल्याचेही अजितदादांनी स्पष्ट केले.

जागतिक पातळीवर चिंतेचा विषय ठरलेल्या ओमिक्रॉन व्हायरसबाबतही अजित पवारांनी खुलासा केला. या व्हायरसबाबत तज्ज्ञांनी वेगवेगळे मत मांडले आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय हा मुख्यमंत्रीच घेतील असे त्यांनी सांगितले. काही तज्ज्ञांनी राज्यात पुन्हा निर्बंध लावण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेत होणाऱ्या व्हिडिओ कॉन्फरन्सनंतरच याबाबतची पुढील दिशा ठरेल असेही ते म्हणाले.

- Advertisement -

जागतिक पातळीवर असणारी कोरोना व्हायरसची स्थिती पाहता केंद्राच्या निर्णयावर आम्ही अवलंबून आहोत. नव्या व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा आरोग्य विभाग जो निर्णय घेणार तो अंमलात येईल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या प्रवाशांसाठी केंद्राच्या सूचनेनुसारच जी नियमावली असेल ती अंमलबजावणी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.


पुण्यात डोमेस्टिक फ्लाईट्सच्या प्रवाशांचे Covid-19 स्क्रिनिंग रद्द – अजित पवार

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -