घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री आज रायगड दौऱ्यावर, निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी

मुख्यमंत्री आज रायगड दौऱ्यावर, निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी

Subscribe

बुधवारी ३ जून रोजी महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी भागातल्या काही जिल्ह्यांना निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. यामध्ये सर्वाधिक नुकसान रायगड जिल्ह्यामध्ये झालं. अलिबाग, मुरूड, हरिहरेश्वर, श्रीवर्धन या ठिकाणी वादळानं मोठं थैमान घातलं. हरिहरेश्वर गाव तर पूर्ण उद्ध्वस्त झालं. अनेक ठिकाणी घरांवरचं छप्पर उडून गेलं, मोठ्या संख्येने विजेचे खांब आणि वृक्ष उन्मळून पडल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान झालेल्या भागाचा दौरा करून तिथल्या पुनर्वसनासाठी मुख्यमंत्री मदतनिधी जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळामुळे जखमी झालेल्या किनारी भागाचं मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे विशेष लक्ष असेल.

कसा आहे मुख्यमंत्र्यांचा आजचा दौरा?

सकाळी
११.३० वा. गोल्डन गेटने रो-रो बोटीतून मांडवा जेटीकडे प्रयाण

- Advertisement -

दुपारी
१२.३० वा. मांडवा जेटी ता. अलिबाग येथे आगमन
१२.३५ वा. मोटारीने थळ ता. अलिबागकडे प्रयाण
१२.५० वा. थळ ता. अलिबाग येथे आगमन आणि निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी
१.२० वा. मोटारीने थळ ता. अलिबाग येथून अलिबागकडे प्रयाण
१.३५ वा. अलिबाग चुंबकीय वेधशाळा येथे आगमन
१.३५ वा. अलिबाग चुंबकीय वेधशाळा येथील नुकसानीची पाहणी
१.४० वा. मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय अलिबागकडे प्रयाण
१.५० वा. निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक
३.१५ वा. रो – रो बोटीने ऑरेंज गेटकडे प्रयाण

सायंकाळी
४.१५ वा. ॲारेंज गेट येथे आगमन

- Advertisement -

रायगड जिल्ह्याची निसर्ग वादळामुळे मोठी हानी झाली आहे. एका अंदाजानुसार रायगडमध्ये तब्बल ५ लाख घरांची पडझड झाली असून ५ हजार हेक्टरवरच्या शेतीला फटका बसला आहे. अनेक तालुक्यांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. झाडं किंवा विजेचे खांब पडल्यामुळे रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे या भागाला तातडीने मदत करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी याआधीच नुकसानीचे पंचनामे २ दिवसांत सादर करण्याते निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -