घरताज्या घडामोडीआमचे हिंदुत्व गदाधारी, तुमची दादागिरी मोडून काढू, जाहीर सभेतून नवहिंदुत्ववाद्यांचा समाचार घेईन;...

आमचे हिंदुत्व गदाधारी, तुमची दादागिरी मोडून काढू, जाहीर सभेतून नवहिंदुत्ववाद्यांचा समाचार घेईन; मुख्यमंत्री

Subscribe

सध्या नवहिंदुत्ववादी, तकलादू हिंदुत्ववादी अशी एक जमात आली आहे. तुमचा भगवा श्रेष्ठ की आमचा भगवा श्रेष्ठ अशी स्पर्धा ते करीत आहेत, पण हिंदुत्व म्हणजे धोतर नाही. घालावं आणि सोडावं. बाबरी पाडली तेव्हा बिळात होतात. आमचे हिंदुत्व घंटाधारी नाही तर गदाधारी आहे हे लक्षात ठेवा. लवकरच मला जाहीर सभा घ्यायची आहे. त्या सभेत मला तकलादू नवहिंदुत्ववाद्यांचा समाचार घ्यायचा आहे. मास्क काढून त्यांचा मला एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावायचा आहे, अशा तिखट शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेला कोंडीत पकडू पाहणार्‍या भाजप आणि मनसेला पुन्हा एकदा इशारा दिला.

बेस्टच्या एनसीएमसी कार्डचे लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी राणा दाम्पत्यावर टीकास्त्र सोडले. आमच्याच घरात हनुमान चालिसा म्हणायची होती, तर नीट सांगायला हवे होते. याअगोदरही खूप पाहुणे मातोश्रीवर येऊन गेले. बाळासाहेब, माँनी त्यांचे स्वागत केले. पाहुणे येती घरी, तोचि दिवाळी हे आम्हाला माहीत आहे. या उक्तीनुसार आम्ही तुमचे स्वागत केले असते, पण दादागिरी करून याल तर आम्ही तुमची दादागिरी मोडून काढू. ती कशी मोडायची हे आम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिकवले आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राणा दाम्पत्याचा समाचार घेतला.

- Advertisement -

टीकेचे भोंगे वाजवणार्‍यांना काडीचीही किंमत देत नाही

जे आता आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत, त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही हिंदुत्वासाठी काय केले? राम मंदिर बांधण्याचा निर्णय हा तुमच्या सरकारने घेतला नाही, तो कोर्टाने घेतला आहे, असा टोला मुख्यमंत्री ठाकरेंनी भाजपला लगावला, तर टीकेचे भोंगे वाजवणार्‍यांना काडीचीही किंमत देत नाही. हे तकलादू नवहिंदुत्ववादी आले आहेत, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -