घरमहाराष्ट्रलॉकडाऊनबाबत मोठा निर्णय होणार?; मुख्यमंत्री रात्री संवाद साधणार

लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय होणार?; मुख्यमंत्री रात्री संवाद साधणार

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री जनतेशी संवाद साधणार आहेत. लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षिय नेत्यांशी चर्चा केली. या बैठकीत लॉकडाऊन करण्याबाबत काहीसं एकमत दिसलं. संसर्ग रोखायचा असेल लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे, असं मुखअयमंत्र्यांसह सर्वच तज्ज्ञांनी बोलून दाखवलं आहे.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज देखील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आज लॉकडाऊनबाबतची मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे, असं सांगितलं. दरम्यान, आज मुख्यमंत्री रात्री ८.३० वाजता लाईव्ह येत जनतेशी संवाद साधणार आहेत. टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीनंतर लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आज लॉकडाऊनबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

ब्रेक द चेन या नव्या मोहिमेनुसार राज्य सरकार लॉकडॉऊन घोषित करण्याची शक्यता आहे. या ब्रेक द चेन लॉकडॉऊनमध्ये केंद्राने जो लॉकडाऊन लावला त्यात ज्या चूका होत्या त्या करायच्या नाही आहेत असा निर्णय घेण्यात येणार असल्याचं समजतंय. हा लॉकडाऊन पंधरा दिवसाच असू शकतो. यामध्ये आपत्कालीन सेवा सुरू राहणार आहे. मॉल्स, दुकान बंद होऊ शकतात पण जीवनावश्यक वस्तूंची दुकानांना परवानगी असू शकते. किराणामाल, भाजीपाल्याची दुकानं सुरु राहण्याची शक्यता आहे. जिल्हानिहाय बेडची संख्या दोन-तीन दिवसात वाढवले जाऊ शकतात. जिल्हा पातळीवरच्या सीमा बंद केल्या जाऊ शकतात. लोकलबद्दल विचार सुरु आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -