घरताज्या घडामोडीपंतप्रधान मोदींच्या कोरोना परिस्थिती आढावा बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे अनुपस्थित, आरोग्यमंत्री टोपे राहणार...

पंतप्रधान मोदींच्या कोरोना परिस्थिती आढावा बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे अनुपस्थित, आरोग्यमंत्री टोपे राहणार हजर

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीला उपस्थित राहणार नाही आहेत. व्हिसीद्वारे मुख्यमंत्री या बैठकीला हजर राहणार होते.

देशातील कोरोना परिस्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आढावा घेत आहेत. ज्या राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार होते पंरतु ते आता अनुपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि आरोग्य विभागाचे सचिव व अधिकारी बैठकीला हजर राहतील अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील ज्या राज्यांत जास्त कोरोनाबाधितांची संख्या आहे. त्या राज्यांची आढावा बैठक घेत आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसुद्धा उपस्थित राहणार होते. गुरुवारी दुपारी साडेचार वाजता ही बैठक आयोजित करण्यात येणार आहे. परंतु आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा, लसीकरण आणि औषधांबाबत या बैठकीत चर्चा कऱण्यात येणार आहे.

- Advertisement -

तसेच बैठकीमध्ये देशातील कोरोना परिस्थितीवर चर्चा, सध्या लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये सुधारणा करण्याबाबत चर्चा आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहणार अनुपस्थित

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीला उपस्थित राहणार नाही आहेत. व्हिसीद्वारे मुख्यमंत्री या बैठकीला हजर राहणार होते. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीबाबत काही माहिती दिली नाही आहे.

- Advertisement -

देशातील या राज्यांत कोरोनाचा कहर

देशातील अनेक राज्यामध्ये कोरोना परिस्थिती बिकट झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरात या राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. यामुळे चिंता वाढली आहे.


हेही वाचा : ‘मराठी पाट्यांचं श्रेय फक्त मनसेचं’ ते लाटण्याचा आचरटपणा करू नये, राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -