घरताज्या घडामोडीशिथिलता नाही तेथील नागरिकांनी संयम बाळगावा, लोकलबाबत मुख्यमंत्री म्हणतात लवकरच....

शिथिलता नाही तेथील नागरिकांनी संयम बाळगावा, लोकलबाबत मुख्यमंत्री म्हणतात लवकरच….

Subscribe

स्वतःच मुंबई मॉडेल तयार करुन त्याची दखल जगाने घेतली आहे

कोरोनाची परिस्थिती सुधारत असताना राज्यातील सर्वच जिल्हा आणि शहरांतून कोरोना निर्बंधात शिथिलता देण्याबाबत मागणी करण्यात येत आहे. परंतू ज्या ठिकाणी शिथिलता देण्याबाबत परिस्थिती चांगली आहे तिकडे राज्य सरकारनं शिथिलता दिली आहे. ज्या ठिकाणी शिथिलता देण्यात आली नाही. तेथील नागरिकांनी धीर सोडू नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच मुंबईतील लोकल बाबत सरकार विचार करत आहे. लोकल सुरु करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील एच-पश्चिम वॉर्डमधील वॉर्ड ऑफिसच्या नव्या वास्तूचं उद्घाटन असलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, या सगळ्या संकटाचा सामना करताना नागरिकांच्या सेवेत खंड पडू दिला नाही. कोरोनाच्या काळात नागरिकांकडून शिथिलता देण्याची मागणी करण्यात येत आहे. पंरतू ज्या ठिकाणी शिथिलता देऊ शकत आहे. तिकडे शिथिलता दिली आहे. तर जिथे शिथिलता देऊ शकत नाही तिकडे नाईलाज आहे. पण याचा अर्थ असा नाही की हे बंद म्हणजे कायमचे बंद, लोकल सुरु करण्याबाबतही विचार सुरु आहे. ज्या ठिकाणी शिथिलता देण्यात आली आहे. तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांत देखील शिथिलता देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

मुंबई मॉडेलची दखल जगाने घेतली

धारावीसारख्या भागात कोरोनाला रोखायचे आणि त्यावर उपचार करण्यात आला. कोरोनाला ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंट या गोष्टी बोलायला सोप्या वाटतात परंतू यावरही उपचार पद्धत नसतानाही उपचार केले आहेत. एक नवीन मॉडेल तयार केले आणि हे करत असताना नैसर्गिक आपत्ती कोसळत आहेत. काही दिवसांचा पाऊस काही तासात होत आहे. ८ ते १० दिवसांपूर्वी चिपळूण महाड , सातारा, सांगली कोल्हापूर, दरडींमुळे पूरामुळे नुकसान झाले तिथेही मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाठवून मदतकार्य केलं आहे.

बऱ्याचशा गोष्टी आहेत की, मुंबईत पहिल्या होतात आणि देशात नंतर होतात. काल करण्यात आलेली जिनोम सिक्वेंन्सिंग लॅब महापालिकेची पहिली आहे. सर्वजण घरी असताना ही लोकं महापालिकेचे कर्मचारी रस्त्यावर होते आणि ते लोकं रस्त्यावर होते यामुळे आपण रस्त्यावर येऊ शकलो. पण लॉकडाऊनच्या काळात कोरोना झाला की जवळ जात नव्हते अशा वेळी दवाखाने उघडे ठेवणे, काळजी घेणे अशा सगळ्या गोष्टी करत होतो. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना केवळ येण्या जाण्याची परवानगी दिली होती. या सगळ्या मंडळींना सुद्धा जीव आहे. कुटुंब आहे. काहीजण कोरोनातून बरे झाले तर काहीजण निघून गेले पण या काळात महापालिकेने केलेले काम अद्वितीय आहे. आणि स्वतःच मुंबई मॉडेल तयार करुन त्याची दखल जगाने घेतली आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांचा कर्मचाऱ्यांना सल्ला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका वॉर्डमधील कर्मचाऱ्यांना म्हटलं आहे की, मला इथल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एकच सांगायचे आहे की, जनता ही अनेकदा आधारासाठी येत अशते. त्यांच्या जन्माच्या दाखल्यासाठी येत असतात आपल्यासाठी वाटतं ह्याच्यासाठी काय पण त्याच्याठी फार महत्त्वाचं असते. त्रासलेला नागरिक असतो पण एका विश्वासाने येतात की इथं गेल्यानंतर माझे काम होईल, कदाचित एखाद्या गोष्टीला वेळ लागत असेल पण आपली वागणूक अशी ठेवा की एखादा कपाळावर अटी घेऊन येणारा नागरिक समाधानाने गेला पाहिजे तर या संपुर्ण वास्तुचे सार्थक झाले असे म्हटल्यासारखे होईल या वास्तूला सजीव करण्यासाठी वातावरण हसतं खेळत राहिले पाहिजे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -