Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र थोरातसाहेब जेवायला बोलवा, आम्ही 'स्वबळा'वर येऊ; मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसला मिश्किल टोला

थोरातसाहेब जेवायला बोलवा, आम्ही ‘स्वबळा’वर येऊ; मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसला मिश्किल टोला

Related Story

- Advertisement -

महाविकास आघाडीमध्ये गेले काही स्वबळाच्या नाऱ्यावरुन धुसफूस सुरु आहे. यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी काँग्रेसला मिश्किल टोला लगावला आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जेवायला बोलवावं, आम्ही स्वबळावर जेवायला येऊ, असा मिश्किल टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळी काँग्रेसला लगावला. यानंतर एकच हशा पिकला. जलभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जेवणाचा मुद्दा उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला टोला लगावला. “जेवणाचा विषय दादा आपण काढला, थोरात साहेब म्हणाले की कोरोनामुळे ते जमले नाही. तुम्ही त्याची काळजी करु नका, तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा , कोरोनाची काळजी करु नका, आम्ही तुमच्याकडे स्वबळावर जेऊ….स्वबळाचा अर्थ न भिता…उद्या परत जेवणावरुन आघाडीत बिघाडी…तसं काही नाही आहे. पण हे खरोखर महत्त्वाचं आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आमच्याकडे जेवताना कोरोना नव्हता का? – अजित पवार

- Advertisement -

“शरद पवार जेव्हा मंत्री होते, तेव्हा कॅबिनेटचा दिवस जेव्हा असायचा, त्याच्या आधी सगळे कॅबिनेट पत्नीसहीत एकेकाकडे जेवायला असायचे. बुधवारी कॅबिनेट असेल तर मंगळवारी रात्री जेवण असायचं. त्यानिमित्ताने सगळे मंत्री एकत्र यावेत, एकूणच त्याला परिवाराचं स्वरुप येतं आणि त्यातून कामे चांगल्या पद्धतीने होतात. महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर मुखअयमंत्र्यांनी पहिलं जेवण दिलं, मी दुसरं जेवण दिलं. मला वाटलं तिसरं जेवण आता जयंतराव देतील, बाळासाहेब देतील, अशोकराव देतील, भुजबळ देतील,” असं अजित पवार म्हणाले. यावेळी थोरात यांनी कोरोना कोरोना…असं म्हणाले. त्यावर अजित पवार यांनी “काय नाय कोरोना…उद्धव ठाकरे साहेबांकडे जेवण असताना कोरोना होता ना!…अजित पवार यांच्याकडे जेवताना कोरोना होता ना…! अरं काय तरी पटेल असं बोलत चला,” असं म्हणाले. पुढे बोलताना अजित पवार यांनी गंमतीचा भाग सोडा पण त्या निमित्ताने एकत्र जमले तर एकोपा वाढतो. समज-गैरसमज असतील तर त्या ठिकाणी दूर होतात. यातून चांगला संदेश जात असतो. याची नोंद जर सेवासदन, रामटेक, रॉयल स्टोनने घेतली तर बरं होईल, असं अजित पवार म्हणाले.

 

- Advertisement -