घरताज्या घडामोडी"आधी किमती वाढवायच्या...''; पेट्रोल-डिझेलच्या दर कपातीवर मुख्यमंत्र्यांचा मोदी सरकारवर पलटवार

“आधी किमती वाढवायच्या…”; पेट्रोल-डिझेलच्या दर कपातीवर मुख्यमंत्र्यांचा मोदी सरकारवर पलटवार

Subscribe

पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and diesel) वाढत्या दराबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मोठा निर्णय घेतला असून केंद्रीय अबकारी कर कमी केला आहे. यामुळे देशात वाढणारी महागाई (Inflation) कमी होण्याची शक्यता असून सर्वसामान्यांना हा मोठा दिलासा आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and diesel) वाढत्या दराबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मोठा निर्णय घेतला असून केंद्रीय अबकारी कर कमी केला आहे. यामुळे देशात वाढणारी महागाई (Inflation) कमी होण्याची शक्यता असून सर्वसामान्यांना हा मोठा दिलासा आहे. मात्र मोदी सरकारच्या निर्णयानंतर राज्याचे मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला आहे. ‘आधी किंमती वाढवायच्या नंतर नाममात्र कमी करण्याचा देखावा नको’, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी (Cm Uddhav Thackeray) केंद्रावर केली आहे.

“आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही. आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवून न ठेवता सहा सात वर्षांपूर्वी असलेला अबकारी कराइतकी कपात केल्यासच खऱ्या अर्थाने देशातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करावयास हवे अशी अपेक्षा आहे”, असे मुख्यमंत्री यांनी म्हटले.

- Advertisement -

अबकारी कर कपात

पेट्रोल, डिजेल आणि गॅसचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांमना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. मात्र, आता देशातील जनतेचा विचार करता केंद्र सरकारने (central government) शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कपात केला.

- Advertisement -

पेट्रोलवरील केंद्रीय अबकारी कर प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी दिली. त्यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9 रुपये 50 पैशाने तर डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहेत.

हेही वाचा – ठाण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन; पंतप्रधान कार्यालयाला पाठवले अंत्यसंस्काराचे साहित्य

सर्वसामान्य जनतेला काही अंशी दिलासा

केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 9 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलेंडर (12 सिलेंडरपर्यंत) 200 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला काही अंशी दिलासा मिळाला. अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र याबाबत काहीसे वेगळे मत व्यक्त केले.

हेही वाचा – महागाई विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा

अबकारी कर प्रति लिटर 18.42 रुपये

केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर 18.42 रुपये इतका वाढविला होता आणि आज तो 8 रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली. डिझेलवरील अबकारी कर देखील 18 रुपये 24 पैशांनी वाढविले आणि आता 6 रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे.


हेही वाचा – जातीवाचक बोलणाऱ्या नेत्यांना समज दिलीये; शरद पवारांचे ब्राम्हण संघटनांना आश्वासन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -