घरमहाराष्ट्रमुंबईत सीएनजी 7 रुपयांनी महागला

मुंबईत सीएनजी 7 रुपयांनी महागला

Subscribe

मुंबईला गॅस पुरवठा करणार्‍या महानगर गॅस लिमिटेडने मंगळवारी सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सीनजी 7 रुपयांनी, तर पीएनजी 5 रुपयांनी महाग होणार आहे. ही नवी दरवाढ मंगळवार मध्यरात्रीपासूनच लागू होणार आहे. भाव वाढीनंतर सीएनजीचे दर 67 रुपये प्रति किलोवर पोहोचणार आहेत, तर पीएनजीचे दर प्रति किलो 41रुपये इतके होणार आहेत. पेट्रोल, डिझेल यांच्या किमती सातत्याने वाढत असतानाच आता ग्राहकांना हा आणखी एक मोठा फटका बसणार आहे.

अर्थमंत्री अजित पवार यांनी सीएनजी गॅसवरील व्हॅटमध्ये कपात करण्याची घोषणा केली होती. त्यासंदर्भातील अधिसूचना जारी झाल्यावर 1 एप्रिलपासून सुधारित दर लागू करण्यात आले होते. व्हॅटमध्ये साडेतेरा टक्क्यांची कपात केल्याने राज्यात सीएनजी प्रति किलोमागे 6 रुपयांनी तर पीएनजी साडेतीन रुपयांनी स्वस्त झाला होता. मात्र, अवघ्या चारच दिवसांमध्ये महानगर गॅस लिमिटेडकडून सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. याचा मोठा फटका हा नागरिकांना बसणार आहे.

- Advertisement -

मुंबईत मंगळवार मध्यरात्रीपासून सीएनजी आणि पीनएजीच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ होणार आहे. महानगर गॅस लिमिटेडकडून ही दरवाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या किमतींमध्ये 7 रुपयांची वाढ होणार आहे. सुधारित दरानुसार सीएनजी गॅसची किंमत 67 रुपये प्रति किलो होणार आहे. तर पीएनजीच्या किमतीमध्ये किलोमागे पाच रुपयांची वाढ होणार असून पीएनजी 41 रुपये प्रति किलोवर पोहोचणार आहे.

राज्य सरकारने व्हॅट कमी केल्यामुळे सीएनजीचे दर कमी झाले होते. मात्र, आता महानगर गॅस लिमिटेडने दर वाढवल्याने याचा मोठा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. राज्य सरकारकडून सीएनजीवरील व्हॅट साडे तेरा टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे सीएनजी गॅसच्या दरात घसरण झाल्याचे पहायला मिळत होते. 1 एप्रिलपासून सुधारित दर लागू झाले होते. मात्र, आता पुन्हा एकदा कंपनीकडून दरात वाढ करण्यात आली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -