घरताज्या घडामोडीसमृद्धी महामार्गालगतच्या सीएनजी गॅस पाईपलाईनचा 'इतक्या' जिल्ह्यांना होणार फायदा

समृद्धी महामार्गालगतच्या सीएनजी गॅस पाईपलाईनचा ‘इतक्या’ जिल्ह्यांना होणार फायदा

Subscribe

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य समृद्धी महामार्ग उद्धाटनाच्या प्रतिक्षेत आहे. या समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई प्रवास जलद होणार आहे. तसंच, आता महामार्गालगत सीएनजी पाइपलाइन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य समृद्धी महामार्ग उद्धाटनाच्या प्रतिक्षेत आहे. या समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई प्रवास जलद होणार आहे. तसंच, आता महामार्गालगत सीएनजी पाइपलाइन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. अमरावतीसह समृद्धी महामार्ग ज्या जिल्ह्यांतून किंवा जिल्ह्यांच्या आजूबाजूने गेला आहे, त्या जिल्ह्यात आगामी काळात सीएनजी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलला पर्याय उपलब्ध होणार आहे. शिवाय, गॅसवाहिनीला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दर 20 मीटर अंतरावर वॉल्व्हदेखील टाकण्यात येणार आहेत.

राज्यभरातील अनेक भागात सीएनजी उपलब्ध झाला आहे. मात्र अनेक भाग हे अद्यापही सीएनजीच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचा महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्ग नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, बुलडाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक व ठाणे या जिल्ह्यांतून गेलेला आहे. यापैकी औरंगाबाद, नागपूर, ठाणे, नाशिक व अहमदनगर वगळता कुठेही सीएनजीची योजना सुरु झालेली नाही.

- Advertisement -

मिळालेल्या माहितुसार, नागपूरसारख्या ठिकाणी सीएनजी मुंबई, पुण्यातून टँकरद्वारे वाहतूक करून पोहोचवला जातो. त्यामुळे अल्प प्रमाणात आहे. तसेच मुंबई पुण्याच्या तुलनेत दीडपट महाग आहे. गॅस पाइपलाइनद्वारे पुरवलेला सीएनजी पुरेशा प्रमाणात स्वस्त राहणार आहे. कारण पाइपलाइनमुळे वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होणार आहे.

समृद्धी महामार्गाला लगत टाकण्यात येत असलेल्या पाइपलाइनमधून 16 एमएमएससीएमडी इतका गॅस वहन करण्याची क्षमता आहे. गेल ही कंपनी देशभरात अशा प्रकारे पाइपलाइनद्वारे गॅस पोहोचवण्याचे काम करणारी यंत्रणा आहे. तूर्तास 60 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरीत 40 टक्के काम आगामी चार ते पाच महिन्यात पूर्ण होणार आहे.

- Advertisement -

त्यानंतर स्थानिक स्तरावर गॅस वितरणाचे काम घेतलेल्या कंपन्यांकडून स्थानिक ठिकाणी काम सुरु होईल व नंतर नागरिकांना शहरात, जिल्ह्यात सीएनजीचे वितरण सुरु होणार असल्याचे समजते.

नागपूरसाठी केसीई प्रायव्हेट लिमिटेड, वर्धा्यासाठी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोल्यासाठी अदानी टोटल गॅस, बुलडाण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड, जालन्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही कंपनी काम पाहणार आहे.


हेही वाचा – उत्तरकाशीतील यमुनोत्री महामार्गाचा 15 मीटरचा भाग खचला; 4200 चारधाम यात्री अडकल्याची भीती

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -