घरताज्या घडामोडीमुंबईत CNG च्या दरात आज मध्यरात्रीपासून दरवाढ होणार लागू

मुंबईत CNG च्या दरात आज मध्यरात्रीपासून दरवाढ होणार लागू

Subscribe

पेट्रोल आणि डिझेलच्या प्रति लिटरच्या दराने शंभरी पार केलेली असतानाच सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. मुंबईत गॅस पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने पुन्हा एकदा आपल्या दरांमध्ये वाढ करत असल्याचे घोषित केले आहे. आज मध्यरात्रीपासूनच ही दरवाढ लागू होणार आहे. एमजीएलच्या सीएनजी तसेच पीएनजीच्या घरगुती ग्राहकांनाही ही झळ बसणार आहे. यामध्ये CNG च्या दरामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. सीएनजीचा दर हा २.५८ प्रति किलो ग्रॅम इतका वाढला आहे. तर पीएनजीच्या दरात ०.५५ रूपयांनी वाढ झाली आहे.

दरवाढीचे काय आहे कारण ?

गॅस पाइप लाईन वाहतुकीच्या खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे परिचालन खर्च आणि अतिरिक्त खर्चाचे अंशतः आच्छादन करण्यासाठी महानगर गॅस लिमिटेड (MGL) आपल्या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) किंमतीत ₹ २.५८/ किग्रॅ आणि घरगुती पीएनजी (PNG) किंमतीत ₹ ०.५५ / ने वाढविले आहे. ही दरवाढ १३ जुलै २०२१ च्या मध्यरात्री / १४ जुलै २०२१ रोजी सकाळपासूनच मुंबईत लागू होईल.

- Advertisement -

मुंबई आणि आसपासच्या सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या सर्व करांसह सुधारित वितरित किंमती अनुक्रमे ₹ ५१.९८ / किलोग्राम आणि ₹ ३०.४०/ एससीएम (स्लॅब 1) आणि ₹ ३६.००/ एससीएम (स्लॅब 2) असतील.

एमजीएलची सीएनजी मुंबईतील सध्याच्या किंमतीच्या पातळीवर अनुक्रमे पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सुमारे ६७% आणि ४७% आकर्षक बचत देते असे कंपनीने म्हटले आहे. घरगुती एलपीजीच्या सध्याच्या किंमतीच्या तुलनेत एमजीएलचे डोमेस्टिक पीएनजी ३५% बचत देत असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -