मुंबईकरांना मोठा दिलासा! केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वीच सीएनजीच्या दरात घट

केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वीच मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. सीएनजीच्या दरात कपात करण्याचा निर्णय महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून घेण्यात आला आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरात सीएनजीच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. ३१ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. सीएनजीच्या कपात अडीच रुपयांनी कपात करण्यात आल्याची माहिती महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सीएनजीच्या किंमतीत घट झाल्याने वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये सीएनजी दरात ८० रुपयांवरून ८६ रुपये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर एक ते दोन वेळेस वाढ झाल्याने सीएनजी दर ८९.९० रुपयांना प्रतिकिलो होते. परंतु आता त्यामध्ये अडीच रुपयांनी कपात करण्यात आली आहे.

महानगर गॅसच्या या मोठ्या निर्णयामुळे ८ लाखांहून अधिक ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे. नवीन वर्ष सुरू होण्याआधीच सीएनजीच्या दरात वाढ झाली होती. त्यावेळी ३.५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. तसेच घरगुती वापरासाठी पीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ करण्यात आली होती.


हेही वाचा : Economic Survey: इलेक्ट्रिक वाहनांची पसंती वाढतेय, वर्षभरात कोट्यवधी EV विक्रीचा