Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रCNG Price Hike : निवडणूक निकालाआधीच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! सीएनजीच्या दरात वाढ

CNG Price Hike : निवडणूक निकालाआधीच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! सीएनजीच्या दरात वाढ

Subscribe

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. यानंतर उद्या म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. यानंतर उद्या म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. (CNG price hiked by Rs 2 even before assembly election results)

सरकारने शहर गॅस वितरण कंपन्यांसाठी प्रशासकीय किंमत यंत्रणा (APM) गॅस वाटप 20 टक्क्यांनी कमी केले आहे. सलग दुसऱ्या महिन्यात ही कपात करण्यात आली आहे. या पाऊलामुळे एमजीएल आणि आयजीएलसारख्या कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महानगर गॅस लिमिटेडने (MGL) सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. आजपासून (22 नोव्हेंबर) नवीन दर लागू झाले आहेत. त्यामुळे आता राज्यभरात सीएनजीचा दर 77 रुपये प्रति किलो झाला आहे. महानगर गॅस लिमिटेडने यापूर्वी जुलैमध्ये सीएनजीच्या दरात वाढ केली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai News : अखेर त्या वकिलांना न्याय मिळाला, 15 वर्षांनंतर आरोपीचा शिक्का पुसला गेला

- Advertisement -

महानगर गॅस लिमिटेडने पाच महिन्यांत केलेली ही दुसरी दरवाढ आहे. एमजीएलने घेतलेल्या या निर्णयानंतर इतर गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्याही आपले दर वाढवू शकतात. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर सर्व कंपन्या किमती बदलत आहेत. या वाढीमुळे सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांच्या खर्चातही वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे या घोषणेचा थेट परिणाम महानगर गॅस लिमिटेडच्या शेअर्सवरही दिसून आला. एमजीएलच्या शेअर्समध्ये सुमारे 3 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. शेअर्स 1,160 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहेत.

हेही वाचा – BMC : कर थकबाकी वेळेत न भरल्यास… या बड्या मालमत्ताधारकांना पालिकेचा इशारा

निवडणुकीमुळे दरात वाढ करण्यास विलंब

दरम्यान, महानगर गॅस लिमिटेड काही दिवसांपूर्वी सीएनजीच्या दरात वाढ करणार होती, मात्र महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमुळे कंपनीला काही काळ थांबावे लागले. पण आता 20 नोव्हेंबर रोजी निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. मात्र त्याआधीच कंपनीने सीएनजीच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -