घरमहाराष्ट्रठाकरे सरकारचा मोठा दिलासा! राज्यात ‘CNG’ ६ रुपयांनी तर ‘PNG’ ३.५० रुपयांनी...

ठाकरे सरकारचा मोठा दिलासा! राज्यात ‘CNG’ ६ रुपयांनी तर ‘PNG’ ३.५० रुपयांनी स्वस्त

Subscribe

मुंबई परिसरात सीएनजी प्रतिकिलो ६ रुपयांनी स्वस्त झालं आहे. तसंच, पाईपद्वारे स्वयंपाक गॅस प्रति एससीएम ३.५० रुपये स्वस्त झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी घट झाली आहे.

मुंबई परिसरात सीएनजी प्रतिकिलो ६ रुपयांनी स्वस्त झालं आहे. तसंच, पाईपद्वारे स्वयंपाक गॅस प्रति एससीएम ३.५० रुपये स्वस्त झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी घट झाली आहे. त्यानुसार, नवीन दराप्रमाणे मुंबई परिसरात सीएनजी ६० रुपये प्रति किलो तसंच, पाईपद्वारे स्वयंपाकाचा पीएनजी आता ३६ रुपये प्रति एससीएम मिळणार आहे. गॅसचे दर कमी झाल्यामुळं सर्वसमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र सरकारने सीएनजी आणि पीएनजीवरील व्हॅट ३ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. त्यानंतर दोन्ही गॅसच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. महानगर गॅस लिमिटेड या मुंबईतील गॅस पुरवठा कंपनीने सीएनजीच्या किरकोळ दरात ६ रुपयांनी कपात केली आहे. याशिवाय घरांना पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या एलपीजीचा (पीएनजी) दरही ३.५० रुपयांनी कमी झाला आहे.

- Advertisement -

महानगर गॅस लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारनं १ एप्रिलपासून नैसर्गिक वायूवरील व्हॅटमध्ये मोठी कपात केली आहे. यावरील व्हॅट आता १३.५ टक्क्यांवरून ३ टक्के करण्यात आला आहे. म्हणजेच त्यात १० टक्के कपात झाली आहे. या निर्णयामुळं सीएनजीच्या दरात आता ५.७५ रुपये किलोनं घट झाली आहे.

- Advertisement -

”अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर आज १ एप्रिल २०२२ पासून १३.५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत कमी झाल्यानं राज्यात घराघरांत पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस तसंच वाहनांसाठीचा सीएनजी इंधन स्वस्त झाला आहे”, अशी माहिती अजित पवार यांनी ट्विट करत दिली.


हेही वाचा – Price Hike: CNG-PNG नंतर आता LPG सिंलिडरही 250 रुपयांनी महागला; पटापट तपासा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -