घरट्रेंडिंगसीएनजी 6 रुपयांनी, तर घरगुती पाईप नैसर्गिक वायू 4 रुपयांनी महागला

सीएनजी 6 रुपयांनी, तर घरगुती पाईप नैसर्गिक वायू 4 रुपयांनी महागला

Subscribe

मुंबईत पुन्हा एकदा सीएनजी ६ रुपयांनी, तर घरगुती पाईप नैसर्गिक वायू ४ रुपये प्रति किलोने महाग झाला आहे. सीएनजी दरात करण्यात आलेली ही वर्षभरातील दुसरी सर्वात मोठी वाढ आहे.

मुंबईत पुन्हा एकदा सीएनजी ६ रुपयांनी, तर घरगुती पाईप नैसर्गिक वायू ४ रुपये प्रति किलोने महाग झाला आहे. सीएनजी दरात करण्यात आलेली ही वर्षभरातील दुसरी सर्वात मोठी वाढ आहे. मुंबई महानगर क्षेत्रात आता सीएनजी ८६ रुपये प्रति किलो, तर पीएनजी ५२.५० रुपये प्रति एससीएम झाला आहे. महानगर गॅस लिमिटेडकडून मंगळवारी ही घोषणा करण्यात आली आहे. (CNG went up by Rs 6 while domestic piped natural gas went up by Rs 4)

नवे दर मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात येतील. सीएनजी आणि पीएनजी गॅस दरवाढीबाबत महानगर गॅसने एक पत्रक जारी केले आहे. देशात गॅसच्या वाढलेल्या किमतीचा परिणाम उत्पादन किमतीवर होत असल्यामुळे ही वाढ करण्यात आल्याचे महानगर गॅसने म्हटले आहे.

- Advertisement -

इंधन, गॅस सिलिंडर आणि वीज दरवाढीने अधीच नागरिक त्रस्त असताना आणि वेगवेगळ्या अडचणींचा सामना करत असताना आता महानगर गॅसनेही दरवाढीचा चटका दिला आहे. महानगर गॅसने सीएनजी आणि घरगुती पाईप गॅसच्या दरात वाढ केली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे इंधनाचा स्वस्त पर्याय म्हणून सीएनजीकडे पाहिले जात होते. मात्र सीएनजीच्या दरातही झपाट्याने होणारी वाढ नागरिकांची चिंता वाढवत आहे. नेहमीच पेट्रोल डिझेलला पर्यायी इंधनाचा वापर म्हणून सीएनजी कडे बघितल्या जातं.

- Advertisement -

राज्यातील विविध शहरातील सीएनजीचे दर

  • नागपूर – ११६ रुपये
  • पुणे – ८५ रुपये
  • पिंपरी चिंचवड – ८५ रुपये
  • मुंबई ८० रुपये
  • नवी मुंबई – ८० रुपये
  • ठाणे – ८० रुपये
  • नाशिक – ६७.९० रुपये
  • धुळे – ६७.९० रुपये

हेही वाचा – माझ्या गाडीवरील हल्ला पूर्वनियोजित; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -