घरमहाराष्ट्रदापोली समुद्र किनाऱ्यावर सापडलेली 'ती' लाइफ क्राफ्ट, तटरक्षक दलाचा खुलासा

दापोली समुद्र किनाऱ्यावर सापडलेली ‘ती’ लाइफ क्राफ्ट, तटरक्षक दलाचा खुलासा

Subscribe

रत्नागिरी – जिल्ह्यातील दापोली येथे समुद्र किनाऱ्यावर संशयीत बोट सापडल्याची माहिती पसरली होती. यानंतर मच्छीमार आणि स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. यामुळे प्रशासनाने सतर्क होऊन त्याची माहिती घेतली आहे. यावर तटरक्षक दलाने या जहाजाविषयी माहिती दिली आहे. यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून विजयदुर्ग समुद्र किनाऱ्यावर पार्थ जहाजाच्या लाईफ क्राफ्टचा तो भाग असल्याची माहिती दापोली तटरक्षक दलाने दिली आहे.

दापोली किनाऱ्यावर काही संशयास्पद वस्तू सापडल्याची माहिती स्थानिक आणि मच्छामारांनी मिळाली होती. यानंतर स्थानिकांसह मच्छीमारांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. यानंतर तटरक्षक दलाने याची खात्री केली आहे.  विजयदुर्ग किल्यावरील लाईफ क्राफ्टचा तो भाग असल्याचे बोलले जात आहे. या लाईफ क्राफ्टच्या माध्यमातून 19 जणांची सुटका करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.यानंतर नागरिकांना घाबरून न जाण्याचे आणि कोणतीही अफवा अथवा चुकीची माहिती न पसरवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

मालवणमध्ये नौका उलटून एकजण बेपत्ता –

मच्छीमारी करून किनार्‍यावर परतत असताना समुद्राच्या अजस्त्र लाटांच्या तडाख्यामुळे ‘मोरेश्वर कृपा’ नौका उलटली. सोमवारी सकाळी मालवण-देवबाग समुद्र किनारी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत देवबाग येथील विष्णू बळीराम राऊळ (55) हे मच्छीमार बेपत्ता झाले आहेत. तर गौरव राऊळ व गंगेश राऊळ या दोघा मच्छीमारांना वाचविण्यात यश आले आहे. घटनेची माहिती समजताच प्रशासकीय यंत्रणनेने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.दरम्यान बेपत्ता विष्णू राऊळ यांचा शोध  पोलिस, महसूल, सागर रक्षक दलाचे सदस्य, मच्छीमार व ग्रामस्थ यांच्या मदतीने सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता, अशी माहिती मालवण पोलिस निरीक्षक विजय यादव यांच्या वतीने देण्यात आली आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -