Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव; मुख्यमंत्री एकनाथ शिदेंची घोषणा

मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव; मुख्यमंत्री एकनाथ शिदेंची घोषणा

Subscribe

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी निर्माण होत असलेल्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येणार आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा आज केली. गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली.

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी निर्माण होत असलेल्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येणार आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा आज केली. गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. (Coastal Highway In Mumbai Named After Chhatrapati Sambhaji Maharaj Chief Minister Shides Announcement)

“छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य, बलिदान नव्या पिढीला दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. राज्यातील गड, किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मृतिस्थळ वढू बुद्रुक आणि तुळापूर या दोन्ही जागांचा विकास आराखडा राबविण्यात येत आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

“हा ऐतिहासिक ठेवा येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे. मुंबईतील कोस्टल हायवे परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा उभारला जाणार आहे. मराठा समाजाच्या बांधवांना सर्व सोयीसुविधा देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे”, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

“छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मुंबईतल्या गेटवे ॲाफ इंडिया येथे पहिल्यांदाच साजरी होतेय याचा आनंद आहे. महोत्सवाच्या माध्यमातून त्यांचे स्मरण प्रेरणादायी आणि स्फूर्तिदायक असून शिवशंभुरायांचे कार्य, योगदान यांचे स्मरण करणे ही आनंदाची बाब आहे. छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव देशभरात पोहचवला जाईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा भव्यदिव्य करण्याची तयारीदेखील राज्य शासन करीत आहे”, असेही यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


- Advertisement -

हेही वाचा – ‘यांचे अस्तित्व मोदींमुळे, ही सर्व छोटी माणसं’, राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला

- Advertisment -