Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रCoastal Road : तब्बल इतक्या कोटींनी वाढला कोस्टल रोडचा खर्च; वाचा सविस्तर

Coastal Road : तब्बल इतक्या कोटींनी वाढला कोस्टल रोडचा खर्च; वाचा सविस्तर

Subscribe

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेने कोस्टल रोड चे काम सुरू केले. या प्रकल्पाला आधी 12 हजार 721 कोटींची मंजुरी देण्यात आली होती. पण आता या खर्चामध्ये आणखी वाढ होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाच्या खर्चात आणखी 1309 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता हा खर्च 14 हजार कोटींवर गेला आहे. या प्रकल्पाअंतर्गत प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस या भाग 1 च्या कामासाठी 5290 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली होती. (Coastal road cost increased now total expenditure 14 thousand crores)

हेही वाचा : BMC Budget 2025-26 : बेस्टचा अर्थसंकल्प तोट्यातच? भाडेवाढीची शक्यता अन् कोट्यवधी रुपयांचे कर्ज 

- Advertisement -

त्यानंतर बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सी लिंकचे दक्षिणेकडील टोक या भाग 2 साठी 3211 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली होती. पुढच्या टप्प्यामध्ये प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी पार्क या कामासाठी 4220 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली होती. अशा प्रकारे सर्व टप्प्यांतील खर्चात 339 कोटींची वाढ झाली. त्यानंतर एकूण सुधारित खर्च 13060 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मच्छीमारांच्या बोटींच्या जाण्या-येण्यासाठी 2 खांबामधील अंतर वाढवून एकल खांबी बांधकामाचा वापर करण्यात आला. त्यामुळे प्रकल्प खर्चात 922 कोटी रुपयांची वाढ झाली. आता नवीन टेट्रापॅड बसवण्यात आले असून त्यासाठी 47.27 कोटी रुपये खर्च झाले.

मुंबईचा बहुचर्चित कोस्टल रोड हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे. याआधी या प्रकल्पाच्या काही मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. नव्या वर्षात हा प्रकल्प पूर्णत्वास येईल, अशी माहिती मुंबई पालिकेकडून देण्यात येत आहे. अंतिम टप्प्यामध्ये सी लिंक विस्तारामधील मरिन ड्राईव्ह ते वांद्रे- वरळी सी लिंकच्या दिशेने जाण्यासाठी शेवटचा गर्डर टाकण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. मुंबई पालिकेच्या माहितीनुसार, पुढील वर्षी म्हणजेच 2025च्या जानेवारीपर्यंत या प्रकल्पाचा अंतिम टप्पा पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर मरिन ड्राईव्ह ते वांद्रे – वरळी असा दोन्ही दिशांनी गाड्यांना प्रवास करता येणार आहे. अंतिम टप्प्यामध्ये सी लिंक विस्तारासाठी उत्तरेकडील गर्डरची उभारणी पूर्ण झाल्यानंतर आता काँक्रिटीकरण, विद्युत खांबांची उभारणी आणि अन्य तांत्रिक कामे पूर्ण केली जाणार आहेत. ही कामे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -