मुंबईः Costal Road हा मुंबईच्या दृष्टीने महत्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातीहा हा बोगदा खोदाईचा टप्पा पूर्ण होणे एक महत्वाचा टप्पा आहे. या क्षणांचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या १२ हजार ७२१ कोटी रुपये खर्चाच्या Costal Road प्रकल्पातील स्वराज्यभूमी-गिरगावं चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क दरम्यान बोगदा खोदण्याचे अखेरच्या टप्प्याचे काम मंगळवारी दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कळ दाबून पूर्ण करण्यात आले.
याप्रसंगी मुंबई महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, एल अँण्ड टी कंपनी व या प्रकल्पातील सल्लागार कंपन्यांचे अभियंते, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. प्रियदर्शनी पार्क येथे टिबीएम यंत्राने खोदाईचा हा अखेरचा टप्पा पूर्ण करून बोगदा पूर्ण करताच, याठिकाणी काम करणाऱ्या अभियंते, अधिकारी, कर्मचारी-कामगारांनी एकच जल्लोष केला.
हेही वाचाः खुशखबर : Costal Road Toll Free; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई महापालिका आणि प्रकल्प अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या कंपन्या, सल्लागार तसेच अभियंते, कर्मचारी-कामगारांचे अभिनंदन केले. हे काम आव्हानात्मक होते. ते पूर्ण झाल्याने आपण सर्व एका महत्वपूर्ण क्षणाचे साक्षीदार ठरल्याचे कौतुकोद्गारही काढले.
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या प्रकल्पाचे काम मार्गी लागावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष सहकार्य केले. मुख्यमंत्री शिंदे हे देखील या प्रकल्पाच्या कामावर सातत्याने लक्ष ठेवून होते. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल. तो जनतेसाठी खुला होईल, असे प्रयत्न आहेत. यामुळे नागरिकांच्या दैनंदिन वाहतूक सुविधेत एक महत्वाची भर पडणार आहे. हे आव्हानात्मक काम पूर्ण केल्याबद्दल या प्रकल्पासाठी झटणाऱ्या सर्वांचेच कौतुक करावे लागेल, असे ते म्हणाले.
संभाजी महाराजांचे नाव दिल्याबद्दल केले होते कौतुक
मुंबईतील कोस्टल रोडला आपल्या सर्वांचे आदर्श धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. 16 मार्च 2023 रोजी यासंदर्भातील मागणी एका पत्रातून मी त्यांच्याकडे केली होती आणि आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यासंदर्भातील घोषणा त्यांनी केली, मी त्यांचे मनापासून आभार मानतो. या परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा सुद्धा उभारण्यात येणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले आहे. ही छत्रपती संभाजी महाराजांना संपूर्ण महाराष्ट्राच्यावतीने आज जयंतीदिनी अनोखी आदरांजली आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटंल आहे.
मुंबईतील कोस्टल रोडला आपल्या सर्वांचे आदर्श धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केला, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार!
16 मार्च 2023 रोजी यासंदर्भातील मागणी एका पत्रातून मी त्यांच्याकडे केली होती आणि आज… https://t.co/QvApZi6JSZ pic.twitter.com/XGCtCpcblg— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 14, 2023