कोस्टल रोडच्या कामाला वेग, ५८ टक्के काम पूर्ण

'कोस्टल रोड' अंतर्गत दुसऱ्या बोगद्याचे काम ३९ टक्के पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे, कोस्टल रोडच्या एकल स्तंभ उभारण्याचे कामही जवळजवळ ४० टक्के पूर्ण झाले आहे.

coastal road

मुंबईतील विशेषतः पश्चिम उपनगरातील रस्ते वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेने कोस्टल रोडचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत ‘कोस्टल रोड’ चे ५८ टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच, ‘कोस्टल रोड’ अंतर्गत दुसऱ्या बोगद्याचे काम ३९ टक्के पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे, कोस्टल रोडच्या एकल स्तंभ उभारण्याचे कामही जवळजवळ ४० टक्के पूर्ण झाले आहे. (Coastal road work in full swing, 58 percent work done)

हेही वाचा – फोन टॅपिंग प्रकरण: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना 9 दिवसांची ईडी कोठडी

पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त व कोस्टल रोड प्रकल्पाची अतिरिक्त जबाबदारी सांभाळणाऱ्या अश्विनी भिडे यांनी दिली आहे. मुंबईत वाढत्या शहरीकरणाबरोबर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या रस्त्यांवर अतिक्रमण वाढले आहे. परिणामी वाहतुकीसाठी रस्ते कमी पडू लागले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यावर पर्यायी तोडगा म्हणून मुंबई महापालिकेने माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून कोस्टल रोडचे काम २०१८ मध्ये हाती घेतले. नोव्हेंबर २०२३ पर्यंत कोस्टल रोडचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे कोस्टल रोडची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

हेही वाचा – भूषण गगराणी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव

आतापर्यंत कोस्टल रोडचे ५८ टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच, एकल स्तंभ उभारण्याचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातील एकूण १११ हेक्टरपैकी १०७ हेक्टर म्हणजे ९७ टक्के भरणी पूर्ण झाली आहेत. तसेच संरक्षक भिंतीचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुलांखाली बांधण्यात येणाऱ्या १७५ एकल स्तंभ खांबापैकी ७० म्हणजे ४० टक्के खांबांची उभारणी पूर्ण झाल्याचे अतिरिक्त आयुक्त भिडे यांनी सांगितले.

हेही वाचा – सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेस आक्रमक, उद्या मुंबई-नाशिकमध्ये आंदोलन

या प्रकल्पात प्रत्येकी २.०७० किलोमीटर अंतराचा बोगदा दोन्ही बाजूने बांधण्यात येत आहे. पैकी, प्रियदर्शिनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गाकडे (मरिन ड्राईव्ह) जाणारा बोगदा यापूर्वीच पूर्ण झाला आहे, तर दुसऱ्या बाजूच्या बोगद्याचे देखील ३९ टक्के काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण किनारी रस्ता प्रकल्प नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.