कर्णबधिर मुलासाठी कॉक्लिअर इम्प्लान्ट शस्त्रक्रिया ठरली वरदान, ३० डॉक्टरांनाही झाला फायदा

'कॉक्लिअर इम्प्लान्ट' ही शस्त्रक्रिया कमी वयाच्या मूक-बधीर/ कर्णबधीर रुग्णांसाठी वरदान आहे. 'कॉक्लिअर' हे एक लहान स्वरुपाचे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. ते बसविल्यामुळे लहान मुलांमधील कर्णबधिरता दूर होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होते.

Cochlear implant

जन्मतः कर्णबधिर असलेल्या चार वर्षीय मुलावर मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात Cochlear implant ही यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. कांदिवलीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात डॉ. राजेश यादव यांच्या प्रयत्नाने आणि प्रख्यात कान-नाक-घसा तज्ज्ञ पद्मश्री डॉ. मिलिंद कीर्तने यांनी ८ जुलै रोजी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. (Cochlear implant operation successful in bmc hospital)

हेही वाचा – मुंबईतील ८० टक्के झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण

‘कॉक्लिअर इम्प्लान्ट’ ही शस्त्रक्रिया कमी वयाच्या मूक-बधिर/ कर्णबधिर रुग्णांसाठी वरदान आहे. ‘कॉक्लिअर’ हे एक लहान स्वरुपाचे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. ते बसविल्यामुळे लहान मुलांमधील कर्णबधिरता दूर होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होते.

विशेष म्हणजे सदर मुलाच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती. त्यामुळे अशा परिस्थितीत डॉ.आंबेडकर रुग्णालयातील मानसेवी तज्ज्ञ डॉ. धोंड, नोबल फाऊंडेशन, डॉ.भरत जोबनपुत्रा व एड्स कॉम्बॅट यांनी मिळून आर्थिक पाठबळ उभे केले.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे रुग्णालयातील कान-नाक-घसा शस्त्रक्रियागृहातून या शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण देखील करण्यात आले होते. ज्याचा लाभ ३० डॉक्टरांनी घेतला. भविष्यात अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याच्या दृष्टीने कौशल्य आत्मसात करता यावे म्हणून ही प्रक्षेपणाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली होती.

हेही वाचा – कटू स्मृती : रमाबाई आंबेडकर नगर गोळीबार प्रकरणाची 25 वर्षे

या शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण केल्यामुळे ३० डॉक्टरांना शस्त्रक्रिया कौशल्याचे धडे मिळाले. या शस्त्रक्रियेनंतर सदर मुलाला चांगले ऐकायला येईल, असा आत्मविश्वास शस्त्रक्रिया करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
पालिकेच्या रुग्णालयात प्रथमच करण्यात आलेल्या अशा शस्त्रक्रियेसाठी, डॉ. नरेंद्र शर्मा, डॉ. संगमलाल पाल, डॉ. मृण्मयी यांनी सहाय्य केले. यावेळी, रुग्णालयातील मानसेवी तज्ज्ञ डॉ. धोंड आणि डॉ. ललित सेठ हे देखील यावेळी उपस्थित होते.

डॉक्टर बनले देवदूत

सध्या लहान मुलांना जन्मतः काही मोठे आजार उद्भवले तर पालक खचून जातात. आर्थिकदृष्ट्या गरीब एका शेतकरी कुटुंबातील फळविक्रेत्याचा चार वर्षाचा मुलगा जन्मत: मूक-बधीर असल्याचे एका वर्षापूर्वी संबंधित कुटुंबाच्या लक्षात आले. या बालकाच्या उपचारांकरीता त्याच्या आई-वडिलांनी खूप ठिकाणी प्रयत्न केले. आर्थिकदृष्ट्या अडचणींमुळे मोठ्या रुग्णालयांत जाणे परवडत नसल्याने त्यांनी मुंबई महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारांकरीता या बालकाला आणले. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर डॉ. राजेश यादव आदी डॉक्टरांनी, ‘कॉक्लिअर इम्प्लान्ट’ करण्याविषयी सुचविले.

मात्र, या शस्त्रक्रियेचा उपकरण व इतर खर्च देखील परवडणार नसल्याने या कुटुंबाने सांगितले. त्यांची एकूणच परिस्थिती लक्षात घेता आणि या लहानग्याला श्रवणशक्ती देण्याचा निर्धार करुन रुग्णालयातील मानसेवी तज्ज्ञ डॉ. धोंड, नोबल फाऊंडेशन, डॉ. भरत जोबनपुत्रा व एड्स कॉम्बॅट यांनी मिळून आर्थिक पाठबळ उभे केले.