घरमहाराष्ट्रपुणेथंडीची चाहूल! कोरड्या हवामानामुळे राज्यात पुढील चार दिवस गारठ्याचे

थंडीची चाहूल! कोरड्या हवामानामुळे राज्यात पुढील चार दिवस गारठ्याचे

Subscribe

बंगालच्या उपसागरामध्ये दोन दिवसांत पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून हिमालयातही बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे.

वातावरणातील कोरडेपणात वाढ झाल्याने रात्रीच्यावेळी तापमानात घट होऊन गारवा वाढतो आहे. राज्यात पुढील चार दिवस अशीच परिस्थिती राहणार असून पुन्हा तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सध्या गारठा वाढला असून हवामान कोरडे झाले आहे. मागील काही दिवसांपासून थंडी ही वाढली आहे. रात्रीचे तापमान बऱ्याच प्रमाणात कमी होते. या महिन्यात तब्बल तीन वेळा पुण्याचे तापमान हे 12 डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत पोहचले होते.

- Advertisement -

बंगालच्या उपसागरामध्ये दोन दिवसांत पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून हिमालयातही बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. परिणामी उत्तकरेकडच्या राज्यांतील तापमानात कमी होणार आहे. तर महाराष्ट्रातसुद्धा पुढचे चार दिवस तापमान कमी राहणार आहे. गुजरातमध्येही किमान तापमान 2-3 अंशांनी कमी होणार आहे. 23 नोव्हेंबरपासून तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दरम्यान पुण्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान महाबळेश्वरच्या तुलनेत कमी झाले आहेत. या महिन्यात तब्बल तीन वेळा पुण्यातील तापमानात घट झाली होती. पण गुरुवारी अहमदनगर मध्ये सर्वात जास्त गारठा होता. अहमदनगरमध्ये 12.0 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंदकरण्यात आली. तर पुण्यात 12.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. याचसोबत सोलापूर, सातारा, परभणी, अमरावती, गोंदिया, वर्धा जिल्ह्यांमधील तापमान कमी झाली होते.

- Advertisement -

हे ही वाचा – सिंहगडावर वेफर्स, नूडल्सला बंदी; स्टॉलधारकांचेही करणार पुनर्वसन; वन विभागाची माहिती

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -