राज्यात ‘या’ दिवसापासून थंडीचा कडाका वाढणार

मुंबईतही काल पासून हवेत गारवा जाणवायला लागला आहे.

cold snap will intensify in the state

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात थंडी जाणवू लागली आहे. काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण पहायला मिळाले होते. महाराष्ट्रातील गोदिंया जिल्ह्यात ८.६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. राज्यात २० जानेवारीपासून पुन्हा थंडी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २२ आणि २३ जानेवारीनंतर पुणे, नाशिक येथे वातावरण १२ अंशाच्या खाली सरकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर मराठवाडा, विदर्भ, आणि कोकणातही गुलाबी थंडी अनुभवायला मिळणार आहे. मुंबईतही काल पासून हवेत गारवा जाणवायला लागला आहे.

दिल्लीसह उत्तरेकडील राज्यांमध्ये पारा घसरल्याने महाराष्ट्रातील राज्यांमध्ये थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईतील तापमान १६ अंश सेल्सिअसच्या जवळपास असणार असल्याचे सांगण्यात येत आहे.मराठवाड्यातील बऱ्यात ठिकाणी आणि कोकणातही थंडीत वाढ झाली आहे. या भागात पुढील दिवस कोरडे हवामान राहणार असून तापमानात कमालीची घट होण्याची शक्यता आहे.

पुण्यात शनिवारी किमान तापमान १६ अंश सेल्सिअस इतके होते. मालेगाव येथे १७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. राज्यात सर्वात कमी तापमान हे गोंदिया जिल्ह्यात नोंदविले गेले.


हेही वाचा – कोल्हापूर, कणेरीवाडीचा मान : राज्यात ठरली झेडपीची पहिली डिजिटल शाळा !