घरदेश-विदेशमहाराष्ट्रात थंडीची चाहुल तर दक्षिण भारतात पावसाळी वातावरण; हवामान खात्याची माहिती

महाराष्ट्रात थंडीची चाहुल तर दक्षिण भारतात पावसाळी वातावरण; हवामान खात्याची माहिती

Subscribe

राजस्थान मधून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे आणि हिमायलतील पर्वतरांगांमध्ये बर्फवृष्टी होत असल्याने महाराष्ट्रातील तापमानात घट होऊन थंडी वाढली आहे अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

पावसाळा (monsoon) संपल्यानंतर थंडीची (winter) चाहूल लागते. दरम्यान महाराष्ट्रात मुंबई (mumbai) आणि उपनगरांमध्ये ठाणे, नवी मुंबई याचसोबत घाटमाथ्यावर थंडीची जाणवू लागली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये गुलाबी थंडी पसरली आहे. दरम्यान राज्यात किमान तापमानाची नोंद पुण्यात करण्यात आली आहे. 12.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद पुण्यात (pune) करण्यात आली आहे.

राजस्थान (rajasthan) मधून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे आणि हिमायलतील (himalaya) पर्वतरांगांमध्ये बर्फवृष्टी होत असल्याने महाराष्ट्रातील तापमानात घट होऊन थंडी वाढली आहे अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

- Advertisement -

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या आठवड्यात शहरांमध्ये आणि लगतच्या भागात अशीच थंडी कायम राहील. पुढील काही दिवस रात्रीचे तापमान 12 ते 14 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. तर दिवसा उन्हाचे चटके बसतील तर रात्री गारवा जाणवेल.

महाराष्ट्रातील अनेक भागात कमी तापमान 

- Advertisement -

येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात कोरडे हवामान कायम राहणार आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा 1.6 ते 3 अंश सेल्सिअसने कमी असेल. औरंगाबाद 13 अंश, नाशिक 13.3 अंश, महाबळेश्वर 13.8 अंश, सातारा 14.3 अंश आणि नागपूर 14.8 अंश महाराष्ट्रातील या ठिकाणी तापमान कमी राहील.

दक्षिणेत पाऊस पडण्याची शक्यता

दक्षिणेकडील तमिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे, कर्नाटक आणि रायलसीमाच्या उर्वरित भागांवर ईशान्य मान्सून राहण्याची शक्यता आहे. असेही हवामान खात्याने म्हटले आहे. येणाऱ्या आठवड्यात या भागात चांगला पाऊस होण्याची शक्यतासुद्धा वर्तविण्यात येत आहे.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -