घरमहाराष्ट्रराज्यात थंडी वाढणार; काही ठिकाणी पावसाची शक्यता,'असं' असेल हवामान

राज्यात थंडी वाढणार; काही ठिकाणी पावसाची शक्यता,’असं’ असेल हवामान

Subscribe

मुंबई: राज्यात पुढील तीन दिवस तापमानात मोठी घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. तर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे देशात काही राज्यात पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. (Cold will increase in the state Chance of rain in some places the weather will be like this)

सध्या विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणसह विदर्भात कोरडं वातावरण राहणार असून यामुळे पहाटे आणि रात्रीच्या तापमानात घट होणार आहे. तर, दुपारी तापमानात किंचित वाढ होऊन हवामान कोरडं राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर, तामिळनाडू, केरळ, कर्नाटकसह लक्षद्वीप बेटावर आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावासाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जम्मू आणि काश्मीरसह लडाखमध्येही आज अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळेल, असं आयएमडीने म्हटलं आहे.

- Advertisement -

‘असं’ असेल महाराष्ट्राचं वातावरण

राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता नाही. पण, गारठा वाढणार आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणसह विदर्भात आज कोरडं वातावरण पाहायला मिळणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पहाटे आणि रात्री तापमानात घट होताना पाहायला मिळेल. तर, दुपारी तापमानात किंचित वाढ होऊन हवामान कोरंड राहिलं, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात हुडहुडी

बंगालच्या उपसागारात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे ईशान्येकडून भारतापर्यंत तीव्र वारे वाहत आहेत. यामुळे बऱ्याच ठिकाणी पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. तर काही ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. चक्रीवादळामुळे वातावरणात बदल झाला असून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

- Advertisement -

‘या’ भागांत अवकाळी पाऊस

आजपासून पुढील दोन दिवस तामिळनाडू आणि केरळमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. आज 21 नोव्हेंबरला आंध्र प्रदेश किनारपट्टी भागात पावसाची दाट शक्यता आहे. 22 आणि 23 नोव्हेंबर काळात कर्नाटकमध्ये जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळेल.

(हेही वाचा: आ बैल, मुझे मार… ‘त्या’ फोटोवरून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपाला डिवचले )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -