दिवाळीत थंडी होणार कमी, हवामान खात्याचा अंदाज

पुण्यातील तापमान हे १० अंश सेल्सियस पर्यत घसरले होते.

Weather Update next 4 days cold wave waring in maharashtra say IMD
Weather Update: पुढील ४ दिवस राज्यात कडाक्याची थंडी पडणार, हवामान खात्याचा इशारा

राज्यात थंडीच्या मोसमासाला सुरूवात झाली आहे. विदर्भ, मराठवाडा तसेच पुणे, मुंबईत ही थंडीला सुरूवात झाली. गेल्या दोन दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात घट झाली होती. त्यामुळे राज्यात गुलाबी थंडीची चाहुल लागली होती. पुणेकरांनी दोन दिवसात बोचऱ्या थंडीचा सामना केला. पुण्यातील तापमान हे १० अंश सेल्सियस पर्यत घसरले होते. मात्र पुढील दोन दिवसात राज्यात थंडीचा जोर कमी होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

पुणे हवामान खात्याचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, सध्या हवा ही उत्तर पूर्वेकडून दक्षिण दिशेने वाहत आहे. त्यामुळे उत्तरेकडील थंड वारे राज्यात येत असल्याने हवामानात मोठी घट झाली आहे. पुण्यासह राज्यातील काही भागात उद्यापासून थंडी काही प्रमाणाक कमी होणार आहे. असे असले तरी उत्तर भारतीयांना मात्र थंडीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे यंदा दिवाळीत राज्यात कमी थंडी अनुभवायला मिळणार आहे. असे असले तरी पुढचे काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण असणार आहे. त्यानंतर राज्यातील तापमान एखाद्या अंशाने वाढणार आहे.

गेल्या २४ तासात राज्यात थंडीचा पारा मोठ्या प्रमाणात वाढलेला पहायला मिळाला. पुण्यात १०.६ अंश सेल्सिअस कोल्हापूर १५.२ अंश सेल्सियस नाशिक १०.६ सातारा १२.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. त्याचप्रमाणे मुंबईत २२ अंश सेल्सियस, रत्नागिरी १७.३ औरंगाबाद १२ , बीडमध्ये १५.६ अंश सेल्सियस तर चंद्रपूरमध्ये ११.८ परभणीत ९.९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली.