धक्कादायक! भिवंडीत दोन मजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू

भिवंडीतील खाडीपार भागातील दुमजली इमारत कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला.

भिवंडीतील खाडीपार भागातील दुमजली इमारत कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून, बचावकार्य करत आहेत. (Collapse Building death of one in Bhiwandi)

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील मुलचंद कंपाऊंडमध्ये असलेली एक जुनी दुमजली इमारत आज पहाटेच्या सुमारास कोसळली. ही इमारत ३० ते ३५ वर्षे जुनी होती. इमारत कोसळल्यानंतर इमारतीखालील ८ दुकाने होती. ही सर्व दुकाने ढिगाऱ्याखाली दाबली गेली. विशेष म्हणजे दबलेल्या एका दुकानात संबंधीत दुकानदार रात्री दुकानातच झोपले होते. हे कापड्याचे दुकान होते. इमारत कोसळल्यानंतर ते ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरू केले. त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले पण त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

मजीद हबीब अन्सारी (वय 35 वर्षे) असे मयताचे नाव आहे. सध्या या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का? याचा शोध सध्या अग्निशमन दलाकडून सुरू आहे.

ही इमारत कोसळल्यानंतर धोकादायक इमारतींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. धोकदायक इमारतींना नोटिस बजावण्यात आली आहे. पण कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे अशा घटना घडत असतात.

दरम्यान, भिवंडीत अनेक धोकादायक इमारती असून अनेक नागरिकांचे जीव धोक्यात आहेत. परंतु महानगरपालिका असो किंवा ग्रामीण भाग या ठिकाणी वेळीच कारवाई होत नसल्याने अशा घटना घडत आहेत. तसेच, या इमारतीला नोटीस देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


हेही वाचा – …तर दहीहंडी, गणेशोत्सव सण साजरे झाले नसते, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा