घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या बदलीच्या हालचाली; 'यांची' नावे चर्चेत

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या बदलीच्या हालचाली; ‘यांची’ नावे चर्चेत

Subscribe

नाशिक : नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांची बदली होणार असल्याची जोरदार चर्चा महसूल वर्तुळात सुरू आहे. १० मार्च २०२२ रोजी गंगाथरन डी. यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला होता. आता या पदासाठी अनेक नावे चर्चेत असून, यासाठी मुंबईत जोरदार लॉबिंग सुरू असल्याचेदेखील समजते. यातील एका नावावर शिक्कामोर्तब झाल्याचेदेखील खात्रीलायक सुत्रांकडून समजते.

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी १० मार्च २०२२ रोजी तात्कालीन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडून पदभार स्विकारला. यानंतर त्यांनी प्रशासकीय कामात शिस्त आणण्याच्यादृष्टीने अनेक पाऊलेदेखील उचलली. जिल्हाधिकार्‍यांकडे येणार्‍या फाईल थेट न येता संबधित अधिकार्‍यांनीच सादर कराव्यात, असा नियम केला. यामुळे काही अधिकार्‍यांमध्ये नाराजी होती.

- Advertisement -

केंद्र व राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी विशेष मोहिमेच्या माध्यमातून अभियान राबवत आहेत. नाशिक-पुणे रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी जमिनीचे दर ठरविण्यासाठी त्यांनी बैठका घेऊन गावांचे दर जाहीर करत प्रकल्पाला चालना दिली. आदिवासी विभागाच्या पेठरोडवरील एकलव्य निवासी आश्रमशाळेतील भोजनात अळ्या आढळल्याने तेथील विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारले होते. याच आंदोलनाची दखल घेत केंद्रिय अनुसूचित जमाती आयोगाने समन्स काढले. तसेच, इगतपुरीतील वेठबिगारी प्रश्नावरून यापूर्वी केंद्रिय अनुसूचित जमाती आयोगाने नाशिक व नगरचे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांना साक्षीसाठी बोलावले होते. हे अधिकारी गैरहजर राहिल्याने आयोगाने चारही अधिकार्‍यांविरोधात अटक वॉरंट काढले होते. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी आयोगाकडे जाऊन बाजू मांडली.

नाशिक जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांच्या नियुक्तीनंतरही जिल्हाधिकारीपदासाठी अनेकांनी वरिष्ठांकडे लॉबिंगही केले परंतु, राज्यातील सत्तांंतरानंतर हे प्रयत्न अयशस्वी ठरले. आता पुन्हा एकदा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या बदलीची जोरदार चर्चा महसूल विभागात असून दोन दिवसांपूर्वी काही अधिकार्‍यांना त्यांनी आपल्या निवासस्थानी स्नेहभोजनही दिल्याची खमंग चर्चाही सुरू आहे.

- Advertisement -
यांची नावे चर्चेत

जिल्हाधिकारीपदासाठी नंदुरबारचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, तात्कालीन आदिवासी आयुक्त तथा दुग्धविकास आयुक्त मुंबई हिरालाल सोनवणे, ठाण्याचे तात्कालीन जिल्हाधिकारी शिनगारे आदींची नावे चर्चेत असल्याचे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -