घरमहाराष्ट्रपावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तींपासून सावधान!

पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तींपासून सावधान!

Subscribe

अहमदनगर: पावसाळ्यात सर्व विभागांनी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी. तसेच पावसाळापूर्व काळात करावयाच्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात, जेणे करून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. आपत्ती व्यवस्थापनात हयगय करणाऱ्या यंत्रणा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले. जिल्हास्तरीय आणि प्रत्येक तहसील कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

- Advertisement -

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात नैसर्गिक आपत्ती, पूर प्रतिबंधात्मक आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. पावसाळ्यात कोणत्याही प्रकारे जनजीवन विस्कळीत होणार नाही, जीवित वा वित्तीय मालमत्तेची हानी होणार नाही, यासाठी करावयाच्या आवश्यक उपाययोजना संबंधित यंत्रणांनी पावसाळ्यापूर्वीच करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने बहुतांशी विभागांनी काम सुरू केल्याचे दिसून येत आहे. मात्र, आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात कोणत्याही प्रकारे नेमून दिलेली जबाबदारी पार पाडण्यात हयगय होऊ नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

आप्तकालीन कक्ष सुरु राहणार सुरु

प्रत्येक यंत्रणांनी त्यांचा आपत्कालीन कक्ष-३ सुरू ठेवावा. त्या ठिकाणी अधिकारी-कर्मचारी उपस्थित राहतील, याची दक्षता घ्यावी. वेगवेगळ्या यंत्रणांनी गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर व्यवस्थित समन्वय आणि संपर्क ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिल्या. पावसाळ्यात जलजन्य आजारांचे प्रमाण लक्षात घेता आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलसंधारण विभाग, पाटबंधारे विभाग आदींनी आपापल्या क्षेत्रातील जलसाठ्यांची काळजी घ्यावी. तलावांची डागडुजी व्यवस्थित करावी. पशुसंवर्धन विभागाने पावसाळ्यातल पशुंना होणारे आजार लक्षात घेऊन त्याच्या लसीकरणाचे नियोजन करावे. त्यासाठीच्या औषधांचा पुरेसा साठा आताच प्राप्त करुन घ्यावा, असे द्विवेदी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -