college reopen : ऐकावं ते नवल, अजितदादांनी उघडलेले कॉलेज उदय सामंत करणार बंद?

college reopen ajit pawar decision to reopen pune college but uday samant department not gave permission
college reopen : ऐकावं ते नवल, अजितदादांनी उघडलेले कॉलेज उदय सामंत करणार बंद?

पुण्यातील महाविद्यालये सोमवारपासुन खुली करण्याचा निर्णय पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. परंतु सोमवारी महाराष्ट्र बंद असल्यामुळे मंगळवारी प्रत्यक्षात महाविद्याले सुरु होणे अपेक्षित होते. परंतु उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि विद्यापीठाकडून लेखी आदेश महाविद्यालयांना प्राप्त झाला नसल्यामुळे महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना विश्वासात न घेता निर्णय घेतला की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावरुन अजित पवार आणि उदय सामंत यांच्यातील समन्वयाचा अभाव असल्याचे दिसत आहे.

पुण्यातील महाविद्यालये मंगळवारपासून सुरु करण्याचा निर्णय पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. मात्र महाविद्यालयांचे म्हणणे आहे की, महाविद्यालये ज्यांच्या आखत्यारित येतात ते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी लेखी दिल्याशिवाय महाविद्यालये सुरु करण्यात येणार नाहीत. काही मोजक्याच महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी आले आहेत. यामुळेच महाविद्यालयांच्या सुरु होण्याबाबत संभ्रमाची स्थिती पालक, विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे. उच्च-तंत्र शिक्षण विभागाच्या आदेशाची प्रतीक्षा महाविद्यालये करत आहेत. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना विश्वासात न घेता निर्णय दिला की काय अशी शंका उपस्थित होत आहे.

राज्यातील शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाकडून तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे गेला तो मंजूर झाला आणि आदेश जारी करण्यात आला परंतु तसा प्रस्ताव उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून गेला नाही. यामुळे महाविद्यालये कामकाज सुरु करण्यास तयार नाहीत. पुणे महानगरपालिका आयुक्तांकडून महाविद्यालये सुरु करण्यास लेखी आदेश प्राप्त झाले आहेत. परंतु उच्च तंत्र शिक्षण विभाग आणि विद्यापीठाकडून कोणतेही आदेश प्राप्त झाले नाही यामुळे महाविद्यालये सुरु करण्यामध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे महाविद्यालयांकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये ऑनलाईन शिक्षण सुरुच असल्याचेही महाविद्यालयांकडून म्हटलं आहे.


हेही वाचा : Navratri 2021: तुळजाभवानी मंदिरात VIP दर्शन बंद, संस्थानाकडून नवीन नियमावली जाहीर