College Reopen : 1 फेब्रुवारीपासून महाविद्यालय पुन्हा सुरु ; दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत होती. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली होती. मात्र, आता कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येत झालेली घट पाहता महाविद्यालयेसुद्धा पुन्हा सुरु करण्यात येत आहेत. राज्यातील शाळा 24 जानेवारीपासून सुरु झाल्या असून, आता राज्यातील महाविद्यालये 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत.

College resumes from February 1; Admission only to students who have taken two doses
College Reopen : 1 फेब्रुवारीपासून महाविद्यालय पुन्हा सुरु ; दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत होती. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली होती. मात्र, आता कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येत झालेली घट पाहता महाविद्यालयेसुद्धा पुन्हा सुरु करण्यात येत आहेत. राज्यातील शाळा 24 जानेवारीपासून सुरु झाल्या असून, आता राज्यातील महाविद्यालये 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. महाविद्यालय सुरु करणार असल्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आला होता. कोरोनाची परिस्थिती पाहता शाळांप्रमाणे स्थानिक पातळीवरदेखील महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. दोन डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. विद्यापीठ आणि स्थानिक प्रशासन कोविडची परिस्थिती पाहून महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेणार आहेत.

महाविद्यालये सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालये सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला होता. राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि ओमिक्रॉनचा आढावा घेऊन मुख्यमंत्री महाविद्यालये प्रत्यक्षात सुरु करण्याचा निर्णय घेतील अशी माहिती उदय सामंत यांनी दिली होती. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील सर्व शाळा सुरु होणार असल्याची माहिती दिली होती. यामुळे महाविद्यालयांबाबत विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण झाली होती. यावर उदय सामंत यांनी माहिती दिली होती.


हे ही वाचा – राष्ट्रवादीचा लोककलावंतांना मोठा दिलासा, एक कोटी निधी अन् कार्यक्रमांच्या परवानगीचे आश्वासन