College Reopen : कॉलेज सुरु करण्यासंदर्भात आजच निर्णय होणार, उदय सामंत यांची माहिती

Maharashtra college reopen to start academic year after diwali said uday samant
College Reopen : कॉलेज सुरु करण्यासंदर्भात आजच निर्णय होणार, उदय सामंत यांची माहिती

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील महाविद्याले/ कॉलेज सोमवारपासून सुरु करण्याची परवानगी दिली होती. परंतु उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून कोणतेही लेखी निर्देश आले नसल्यामुळे महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. परंतु राज्यातील सर्व कॉलेज सुरु करण्यासंदर्भात आजच निर्णय घेऊन तारीख जाहीर करण्यात येईल अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांकडे कॉलेज सुरु करण्यासंदर्भात प्रस्ताव गेला असून मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच अजित पवारांशी आपला समन्वय असून त्यांच्या निर्णयानुसार कॉलेज सुरु करण्यावर चर्चा करण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीपुर्वी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बैठक घेऊन कॉलेज सुरु करण्यासंदर्भात आज निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. उदय सामंत यांनी म्हटलं आहे की, ७ ते ८ दिवसांपुर्वी अजित पवारांनी बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये पुण्यातील महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भात वक्तव्य केलं होते. यामुळे काही महाविद्यालये सुरु करण्यात आली. परंतु कॉलेज सुरु करणं अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव गेला असून आज चर्चा होईल. आजच कॉलेज सुरु होणार हे जाहीर करण्यात येईल. त्याची नियमावली जाहीर करण्यात येईल आणि आजच कॉलेज सुरु करण्यासाठी कशापद्धतीने विद्यापीठाने कारवाई तसेच उपाययोजना करावी याची माहिती देऊ असे उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांशी समन्वयाचा अभाव नाही

पुण्यातील कॉलेज सुरु करण्याचा निर्णय पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला परंतु उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून लेखी निर्देश न मिळाल्यामुळे कॉलेज सुरु करण्यात आले नाही. यामुळे समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा सुरु होती. यावर उदय सामंत यांनी म्हटलं आहे की, महाविद्यालयांचा संचालकांसोबत समन्वयाचा अभाव आहे. महाविद्यालयांनी संचालकांना विचारले पाहिजे होते. पत्रकार परिषदेचा आधार घेऊन महाविद्यालये सुरु करणे हे योग्य नाही. अजित पवारांनी जे वक्तव्य केलं त्याच अनुषंगाने निर्णय घेण्यात आला आहे. समन्वयाचा अभाव नाही असे काहीही नाही. अजित पवारांशी चर्चा झाली आहे. अजित पवारांनी कॉलेज सुरु केले आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बेंद केले असे काहीही नसल्याचे उदय सामंत यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : भाजपची ऑफर न स्वीकारण्याइतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत – चंद्रकांत पाटील