Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र राज्यातील सर्व महाविद्यालये दिवाळीनंतर होणार सुरु, उदय सामंत यांची माहिती

राज्यातील सर्व महाविद्यालये दिवाळीनंतर होणार सुरु, उदय सामंत यांची माहिती

Related Story

- Advertisement -

राज्यातील महाविद्यालये सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज राज्यातील महाविद्यालेय सुरु करण्यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. राज्यातील महाविद्यालये नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून म्हणजे दिवाळीनंतर सुरु होईल असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेत सांगितले आहे.

सीईटी परीक्षा झाल्यानंतर राज्यातील सर्व महाविद्यालय सुरु करण्याचा मानस आहे. त्यापद्धतीने वाटचाल सुरु आहे. असे उदय सामंत यांनी जाहीर केले. तसेच नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील महाविद्यालय़े सुरु होण्याची शक्यता आहे. कॉलेज ऑनलाईन की ऑफलाईन कशापद्धतीने सुरु करायचे हे त्या परिस्थितीवर अवलंबून असेल. तसेच शैक्षणिक वर्ष २ नोव्हेंबर सुरु होईल. अशी घोषणा उदय सामंत यांनी केली आहे.

- Advertisement -

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी कॉलेज सुरु होतील असं नाही. त्या भागातील कोरोनाची स्थिती काय आहे यावर हा निर्णय घेतला जाईल. तसंच नवीन शैक्षणिक वर्ष कसं असावं त्यासंबंधीची माहिती दिली जाईल” असं उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळूनच राज्यामध्ये कॉलेजेस सुरु केले जाणार आहेत.


Maharashtra CET Exam 2021 : राज्यात १५ सप्टेंबरपासून सुरु होणार MHT-CET परीक्षा – उदय सामंत


 

- Advertisement -