घरताज्या घडामोडीअत्यावश्यक सेवेतील वाहनांना कलर कोड मिळणार, मुंबई पोलिसांची शक्कल

अत्यावश्यक सेवेतील वाहनांना कलर कोड मिळणार, मुंबई पोलिसांची शक्कल

Subscribe

लोकल प्रवासासाठीही कलर कोड देणार

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतो आहे. वाढत्या कोरोनाप्रादुर्भावामुळे राज्याची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. संचारबंदी आणि १४४ कलम लागू केले असतानाही राज्यातील वर्दळीच्या शहरातील गर्दी कमी होताना दिसत नाही आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनावश्यक कामासाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. संचारबंदीत केवळ अत्यावश्यक सेवेतील गाड्यांना फिरण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेक गाड्या रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. गाड्यांची गर्दी कमी करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत फिरणाऱ्या गाड्यांना आता कलर(रंग) कोड देण्यात येणार आहे. त्यामुळे आता उद्यापासून मुंबईच्या रस्त्यावर रंगीबेरंगी गाड्या फिरताना दिसणार आहेत.

मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन केला आहे. यामध्ये संचारबंदी करण्यात आली आहे. परंतु अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. परंतु रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या नियमांचे कडक पालन केले जात आहे. चेक नाका, टोल नाका आणि चौका चौकात वाहनांची गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे ही गर्दी रोखण्यासाठी आत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या गाड्यांसाठी कलर कोड सुरु करण्यात येणार आहे. असे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

मुंबईत फिरणाऱ्या अत्यावश्यक सेवेच्या गाड्यांना तीन कलरमध्ये विभागले आहे. यामध्ये वैद्यकीय कर्मचारी यांच्या गाडीला लाल रंग देण्यात आला आहे. तर भाजीपालाच्या गाडीसाठी हिरवा रंग, तसेच इतर अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांना पिवळा रंग देण्यात आला आहे. तर या कर्मचाऱ्यांना आपल्याला देण्यात आलेल्या रंगाचा ६ इंच गोल सर्कल स्टिकर लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पोलीसांकडून याबाबत लवकरच मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार आहेत.

या मार्गदर्शक सूचना सीआरपीसी १४४ अंतर्गत जारी केल्या जाणार आहेत. सर्व अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना कलर कोड देण्यात येणार असून, कोणी नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल तसेच गाडीतील कर्मचारी अत्यावश्यक सेवेतला आहे का याची पडताळणी केली जाणार आहे. तसेच या निर्णयाचा कोणी गैरफायदा घेतंय का याकडेही लक्ष दिले जाणार आहे.

- Advertisement -

लोकल प्रवासासाठीही कलर कोड देणार

मुंबईत लोकल प्रवास करताना अधिक गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे. लॉकडाऊन असतानाही मध्य मार्ग आणि पश्चिम मार्गावरील ठराविक स्थानकांवर गर्दी पाहायाल मिळाली आहे. विरार, नालासोपारा, ठाणे, दादर, अशा रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच कलर कोड दिला जाणार आहे. यामुळे विनावश्यक फिरणाऱ्यांवर अंकुश ठेवता येणार आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -