घरCORONA UPDATEमहावितरणकडून मीटर रिडिंगला सुरूवात 

महावितरणकडून मीटर रिडिंगला सुरूवात 

Subscribe

कल्याण परिमंडळात प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) वगळून इतर ठिकाणी योग्य दक्षता बाळगण्याच्या हमीवर प्रशासनाने दिलेल्या परवानगीनुसार मीटर रिडिंग व वीजबिल वाटपास सुरुवात करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गेल्या अडीच महिन्यांपासून बंद करण्यात आलेले ग्राहकांच्या वीज मीटरचे रिडींग आणि वीजबिल वाटप महावितरणकडून पुन्हा सुरु करण्यात आले आहे. कल्याण परिमंडळात प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) वगळून इतर ठिकाणी योग्य दक्षता बाळगण्याच्या हमीवर प्रशासनाने दिलेल्या परवानगीनुसार मीटर रिडिंग व वीजबिल वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. या कामात कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

लॉकडाऊनमुळे महावितरणच्या कल्याण परिमंडळात मीटर रिडींग, वीजबिलांचे वाटप व वीजबिल भरणा केंद्र मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून बंद ठेवण्यात आले होते. या कालावधीत ग्राहकांना सरासरी वीजबिल आकारण्यात आले व केवळ डिजिटल माध्यमातून वीजबिल भरणा सुरु होता. परिणामी वीजबिलाचा भरणा सातत्याने घसरून महसूल घटला. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर ठिकाणी जूनच्या सुरुवातीपासून वीजबिल भरणा केंद्र सुरु करण्यात आली आहेत. तर आता ग्राहकांना वीज वापरानुसार अचूक बिल मिळावे व ग्राहकांची गैरसोय दूर करण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने व अटी-शर्थीचे पालन करून मीटर रीडिंग व बिल वाटप सुरु करण्यात आले आहे. संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझरचा वापर व शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे.

- Advertisement -

वीज ग्राहकांनी या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे व वीजबिल भरणा केंद्रात प्रत्यक्ष अथवा www.mahadiscom.in हे संकेतस्थळ, ग्राहकांसाठीचे मोबाईल अँप, विविध पेमेंट अँपच्या माध्यमातून ऑनलाईन वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या जबाबदारीचे पुर्नमुल्यांकन अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांचे पुर्नमुल्यांकन करुन ही पदे खरोखरच आवश्यक आहेत काय ? या बाबत आढावा घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले.

- Advertisement -

ऊर्जा विभागामध्ये तांत्रिक अधिकाऱ्यांचा भरणा मोठया प्रमाणात असून कंपनी नियमानुसार महावितरणची क्षमतावृध्दी अपेक्षित आहे तथापि या विभागाशी संबंधीत उद्भवणाऱ्या उणीवांबाबत असंख्य तक्रारी येत असतात याचाच अर्थ महावितरणच्या प्रणालीमध्ये दरी असल्याचे आढळून येते. तसेच रिक्त जागा पदोन्नतीने भरणे आवश्यक असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मागील दाराने नियुक्त्या देणे गैर आहे, त्यामुळे तरुणांच्या रोजगाराची संधी हिरावल्या जातात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -