Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुंबईतील वज्रमुठ सभेला सुरूवात; आदित्य ठाकरे यांचे भाषण सुरू

मुंबईतील वज्रमुठ सभेला सुरूवात; आदित्य ठाकरे यांचे भाषण सुरू

Subscribe

छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील वज्रमूठ सभेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता महाविकास आघाडीची मुंबईत आज तिसरी वज्रमूठ सभा पार पडत आहे. या सभेला आज विशेष महत्त्व आहे. कारण आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस आहे. त्यामुळे या सभेत संबोधित करताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचं आजचं भाषण महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे फक्त उद्धव ठाकरे यांचंच भाषण नाही तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचंही भाषण महत्त्वाचं आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडीच्या सभेला ठाकरे गटाचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या भाषणाने सुरूवात झाली. आदित्य ठाकरे यांनी भाषणाच्या सुरूवातीपासूनच विरोधकांवर निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. या सभेच्या सुरूवातील महाराष्ट्राचे गाण वाजवण्यात आले. विशेष म्हणजे या सभेला अजित पवारही भाषण करणार असल्याची माहिती मिळते

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -