घरCORONA UPDATEलिव्ह अँड लायसन्सच्या फिजिकल रजिस्ट्रेशनला सुरूवात

लिव्ह अँड लायसन्सच्या फिजिकल रजिस्ट्रेशनला सुरूवात

Subscribe

आता पुन्हा एकदा फिजिकल रजिस्ट्रेशनसाठी सुरूवात करण्यात येत असल्याचे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

लिव्ह अँड लायसन्सच्या फिजिकल रजिस्ट्रेशन वसुलीला मुद्रांक शुल्क आणि नोंदणी कार्यालयाने जुलै २०२० पर्यंत स्थगिती दिली होती. पण आता पुन्हा एकदा फिजिकल रजिस्ट्रेशनसाठी सुरूवात करण्यात येत असल्याचे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या लढाईच्या काळात राज्यात केवळ ई रजिस्ट्रेशनचा पर्याय कार्यालयाकडून देण्यात आला होता. पण आज मुद्रांक शुल्क आणि नोंदणी कार्यालयाचे इन्स्पेक्टर जनरल यांनी एक परिपत्रक जारी करत लिव्ह अँड लायसन्सला फिजिकल रजिस्ट्रेशनला परवानगी देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.

याआधी एप्रिल महिन्यात फिजिकल रजिस्ट्रेशनला एका पत्रकाच्या माध्यमातून संपुर्णपणे स्थगिती आणण्यात आली होती. तसेच जुलै अखेरीपर्यंत ही स्थगिती देण्यात आल्याचे परिपत्रकात नमुद करण्यात आले होते. पण २ जूनला जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात आधीचे परिपत्रक रद्द करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. नवीन परिपत्रकानुसार सर्व उपनिबंधक नोंदणी कार्यालयात लिव्ह अँड लायसन्सचे फिजिकल रजिस्ट्रेशन करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. मर्यादित स्वरूपातील रजिस्ट्रेशन करण्याची मुभा या परिपत्रकानुसार देण्यात आली आहे. मुंबई तसेच मुंबई बाहेरील कार्यालयांनाही हा आदेश लागू होणार आहे. पण जी कार्यालये कंटेन्टमेंट झोनमध्ये आहेत अशा कार्यालयांसाठी परवानगी देण्यात आलेली नाही. याआधी मे महिन्यात एकुण दहा कार्यालये सुरू करण्यात आली होती.

- Advertisement -

ई रजिस्ट्रेशनच्या प्रक्रियेत अनेक अडथळे त्रुटी असल्याचे आढळले होते. तसेच लॉकडाऊन तसेच दंडाची प्रक्रिया याचा ई रजिस्ट्रेशनमध्ये समावेश नव्हता. म्हणूनच फिजिकल रजिस्ट्रेशनची प्रक्रियेची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे ई रजिस्ट्रेशनच्या बरोबरीलाच आता फिजिकल रजिस्ट्रेशन उपलब्ध झाल्याने ग्राहक आणि विकासकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. एकट्या मे महिन्यात अवघा ४३ हजार ५७४ रूपयांचा महसूल गोळा झाला. लॉकडाऊनच्या आधी कोट्यावधी रूपयांचा जिथे महसूल गोळा होत तिथेच ही रक्कम अवघ्या हजारांवर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -