घरताज्या घडामोडीमध्य रेल्वे मार्गावरील एसी लोकलमुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फटका : जितेंद्र आव्हाड

मध्य रेल्वे मार्गावरील एसी लोकलमुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फटका : जितेंद्र आव्हाड

Subscribe

मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकल सुरू करण्यात आल्या आहेत. या एसी लोकल सामन्य लोकल रद्द करून त्याजागी चालवल्या जात आहेत. त्यामुळे सर्वसामन्य प्रवाशांना मोठा फटका बसत असल्याची माहिती माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात दिली.

मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकल सुरू करण्यात आल्या आहेत. या एसी लोकल सामन्य लोकल रद्द करून त्याजागी चालवल्या जात आहेत. त्यामुळे सर्वसामन्य प्रवाशांना मोठा फटका बसत असल्याची माहिती माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात दिली. तसेच, सातत्याने प्रवासी कळवा स्थानाकात या एसी लोकलच्या विरोधात आंदोलन करत आहेत. मात्र त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यचेही आव्हाड यांनी यावेळी सांगितले. (Common passengers facing issues due to AC local on central railway line says Jitendra Awhad)

मध्य रेल्वेवरील एसी लोकलमुळे सर्वसामन्याच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी सर्वसामन्य प्रवाशांच्या आंदोलनाची दखल घेण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

“रेल्वेचा तद्दन मूर्खपणा कि, एकीकडे दैनंदिन कामासाठी मुंबईला ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दूरदूरवरुन हे प्रवाशी येत आहेत. पश्चिम रेल्वे असो, नाहितर मध्य रेल्वे असो, दोन्ही मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची परिस्थिती तशी बिकटच आहे. साधा कोच असलेल्या रेल्वेच्या फेर्‍या कमी करुन आता एअर कंडीशनर गाड्या वाढविण्याचा निर्णय झालेला आहे. इथे साध्या रेल्वेचे दैनंदिन तिकीट परवडत नाही. महिन्याचा मासिक पास परवडत नाही. इथे एसी लोकल काय परवडणार. म्हणजे सर्वसामान्यांच्या हालअपेष्टांमध्ये अजून वाढ करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे आणि मध्ये रेल्वेने घेतला आहे”, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

“दरदिवशी जवळ-जवळ 40 लाख प्रवाशी पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेने प्रवास करीत असतात. ही त्या गरीब रेल्वे प्रवाशांची टिंगल टवाळी आहे. ज्यांना एसी लोकल परवडते त्यांची संख्या 10 टक्के देखील नाही. पण, त्या 10 टक्क्यांसाठी फे-या वाढवून 90 टक्के प्रवाशांसाठीच्या फे-या कमी करणं हा क्रुरपणा आहे. रेल्वे अपघातामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यांची संख्या दामदुपटीने वाढली आहे”, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

- Advertisement -

“पश्चिम रेल्वे आणि मध्ये रेल्वेच्या सर्वच स्टेशनवरील परिस्थिती अत्यंत बिकट व वेदनादायी आहे. याबाबत कुठलाही विचार पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे करताना दिसत नाही. कधितरी याचा स्फोट होईल हे मी लक्षात आणून देतोय. पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तसेच या खात्याच्या मंत्री महोदयांनी याकडे त्वरीत लक्ष द्यावे. कारण, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे ही मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्याची लाईफलाईन आहे. तेव्हा हा इशारा समजा किंवा सुचना समजा. पण, व्यवस्था सुधरायला हवी”, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

नुकताच मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर आता एसी लोकलच्या 10 फेऱ्या वाढणार आहेत. सध्या सुरू असलेल्या सामान्य लोकलच्या जागी 10 एसी लोकल चालवण्यात जाणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना आता आणखी 10 एसी लोकल फेऱ्या मिळाल्या आहेत. एसी लोकल फेऱ्यांमध्ये या नव्या 10 फेऱ्या वाढल्यानंतर एकूण एसी लोकल फेऱ्यांची संख्या 66 इतकी होणार आहे. तर एकूण सर्व लोकल फेऱ्यांची संख्या 1810 इतकी राहणार आहे. मध्य रेल्वेवर प्रवाशांची सर्वाधिक संख्या असलेल्या पिक अवर्समध्ये सकाळी आणि संध्याकाळी 10 एसी लोकल फेऱ्यांची संख्या वाढणार आहे.

वाढवण्यात आलेल्या एसी लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक

  • T36* ठाणे- सीएसएमटी फास्ट लोकल- सकाळी ८.२० वाजता
  • BL-9* सीएसएमटी-बदलापूर फास्ट लोकल- सकाळी ०९.०९ वाजता.
  • BL-20* बदलापूर-सीएसएमटी फास्ट लोकल- सकाळी १०.४२ वाजता.
  • K-51 सीएसएमटी-कल्याण फास्ट लोकल- दुपारी १२.२५ वाजता
  • K-62 कल्याण-सीएसएमटी फास्ट लोकल- दुपारी १.३६ वाजता.
  • T-83 सीएसएमटी-ठाणे स्लो लोकल- दुपारी ३.०२ वाजता.
  • T-96 ठाणे-सीएसएमटी स्लो लोकल- दुपारी ४.१२ वाजता.
  • BL-35* सीएसएमटी-बदलापूर फास्ट लोकल- संध्याकाळी ५.२२ वाजता.
  • BL-54* बदलापूर-सीएसएमटी फास्ट लोकल- संध्याकाळी ६.५५ वाजता.
  • T-129 सीएसएमटी-ठाणे फास्ट लोकल- रात्री ८.३० वाजता.

हेही वाचा – पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर ITMS यंत्रणा बसवणार; मेटेंच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -