घरमहाराष्ट्रमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पहिल्या यादीत राज्यातून एकालाच उमेदवारी

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पहिल्या यादीत राज्यातून एकालाच उमेदवारी

Subscribe

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही त्यांची पहिली यादी जाहिर केली असून राज्यातील एका मतदारसंघातील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची यादीदेखील जाहिर करण्यास सुरुवात केली आहे. आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही त्यांची पहिली यादी जाहिर केली असून राज्यातील एका मतदारसंघातील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. मार्क्सवादी पक्षाने पहिल्या यादीत ४५ उमेदवारांची नावं जाहिर केली आहेत. त्यामधील महाराष्ट्रातून दिंडोरी या मतदारसंघातून त्यांनी जीवा पंडू गावित यांना उमेदवारी दिली आहे. तर आसाम, हरयाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, मध्य प्रदेश ओडिसा, पंजाब, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि उत्तराखंड या राज्यातील काही मतदारसंघातील उमेदवारांची नावं या यादीत आहेत.

 

- Advertisement -

कसा आहे दिंडोरी मतदारसंघ 

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असून सध्या येथे भाजपचे हरिशचंद्र चव्हाण हे विद्यमान खासदार आहेत. भाजप व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपा यांच्या उमेदवारांचेही गावित यांना कडवे आव्हान असणार आहे. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) यांच्यावतीने हेमंत वाघेरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र ७२ हजार ५४८ मतं मिळवतं ते निकालात तिसऱ्या क्रमांकावर आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -