Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी यंदा परभणीत सरासरी पावसाच्या तुलनेत 43 टक्केच पाऊस; अजित पवारांची माहिती

यंदा परभणीत सरासरी पावसाच्या तुलनेत 43 टक्केच पाऊस; अजित पवारांची माहिती

Subscribe

परभणी जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारी योजनांमधून नागरिकांना मिळालेल्या सुविधांचा पाढा वाचला. तसेच, परभणीतील पावसाची माहिती दिली.

‘आगामी काळात अनेक सण येऊ घातले असून, त्या काळात मोठा पाऊस पडत असतो. परभणीमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत 761 मीमी इतका पाऊस पडतो. त्यानुसार 24 ऑगस्टपर्यंत सरासरीच्या 60 टक्के पाऊस पडणं अपेक्षित होतं. मात्र प्रत्यक्षात 43 टक्केचं पाऊस पडला आहे. दोन पावसांमधील अंतर मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे’, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. (Compared to the average rainfall in Parbhani this year the rainfall is 43 percent Information of dcm Ajit Pawar)

परभणी जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारी योजनांमधून नागरिकांना मिळालेल्या सुविधांचा पाढा वाचला. तसेच, परभणीतील पावसाची माहिती दिली. “आगामी काळात अनेक सण येऊ घातले असून, त्या काळात मोठा पाऊस पडत असतो. परभणीमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत 761 मीमी इतका पाऊस पडतो. त्यानुसार 24 ऑगस्टपर्यंत सरासरीच्या 60 टक्के पाऊस पडणं अपेक्षित होतं. मात्र प्रत्यक्षात 43 टक्केचं पाऊस पडला आहे. दोन पावसांमधील अंतर मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे पिकांचं नुकसान झाले आहे. नांदेडवरून नुकताच येत असताना आम्ही पहाणी केली. येलदरी धरणही केवळ 60 टक्केच भरलं आहे. गतवर्षी हे धरण या कालवधीत 90 टक्के भरले होते. सध्या 15 टक्केच उपयुक्त पाणी साठा आहे”, असे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

“परिस्थिती सध्या गंभीर होत आहे. परभणी जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांवरही मोठा परिणाम झाला आहे. गोदावरी नदी कोरडी पडल्यासारखी पाहायला मिळाली. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही नियोजन करत आहोत. वन विभागाला गवतांचे लिलाव न करण्याच्या सुचना केल्या आहेत. त्याचे पेंडा तयार करण्यास सांगितले आहे. काही भागांत अजूनही पाऊस झालेला नाही, त्यामुळे शेतकरी संकटात आहे”, असेही अजित पवार म्हणाले.

“परभणीच्या ऐतिहासिक भूमीमध्ये ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम होत आहे. परभणी संतांची भूमी आहे. संत जनाबाई आणि साईबाबांच्या पदस्पर्षांनी पावन झालेली ही भूमी आहे. शासन आपल्या दारी अभियानाच्या माध्यमातून काही कोटी नागरिकांना घरबसल्या लाभ देण्याचा प्रयत्न करत आहोत. नागरिकांना योजनांची माहिती घरी मिळते. योजनांसाठी कागदं गोळा करण्यासाठी फेऱ्या माराव्या लागत नाही. पण शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना घर बसल्या योजनांची माहिती मिळते”, असेही अजित पवारांनी सांगितले.

- Advertisement -

“सध्या कमी पावसामुळे परभणीत वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र पुरेसा पाऊस न झाल्यान परभणी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला उन्हाच्या झळा बसत आहे. या परिस्थितीत महायुतीचे सरकार सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीने उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील आठवड्यात मंत्रालयात बैठक झाली. सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांची बैठक घेतली”, असेही पवार म्हणाले.

“शाहु, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांनी आमचे महायुतीचे सरकार काम करत आहे. पण काहीजण समाजात भिती निर्माण करत आहेत. अल्पसंख्याक समाजामध्ये सांगतात, की यांचे सरकार असताना वेगळं घडेल. पण मुख्यमंत्र्यांनी मुस्लीम बांधवांची बैठक घेतली. या महाराष्ट्रात जातीय सलोखा ठेवण्याकर्ता हे महायुतीचे सरकार लोकांच्या पाठीशी ताकदीने उभे राहील. काही जण महापुरूषांबद्दल वेगळी वक्तव्य करतात. महापुरूषांबद्दल कोणीच चुकीची वक्तव्य करू नयेत, ते आपले आदर्श असून ही आमची भूमिका आहे”, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.


हेही वाचा – मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवर कोकणकन्या गाऱ्हाणे गात म्हणाली; “थुकपट्टी बंद करून…”

- Advertisment -